• Mon. Nov 25th, 2024

    पॅन्टवरील लेबलवरून पोलिस पोहोचले टेलरकडे; उघडले सर्व रहस्य, आरोपीची एक चूक आणि…

    पॅन्टवरील लेबलवरून पोलिस पोहोचले टेलरकडे; उघडले सर्व रहस्य, आरोपीची एक चूक आणि…

    नागपूर : गुन्हेगार कितीही चतुर असला, तरी एक ना एक असे पुरावा सोडून जातो ज्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागते. नागपुरच्या नीलडोह परिसरामध्ये एका महिलेच्या हत्येचा असाच प्रकार घडला आहे. आरोपीची एक चूक आणि त्याच्या पँटवरील स्टिकरमुळे तो पोलिसांचा ताब्यात गेला. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथून नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली. सिद्धार्थ मेश्राम (३६, बोरगाव, लाखनी) असे आरोपीचे नाव आहे. शिल्पा सुनील उमरे (कार्तिक नगर, राजू नगर, नागपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

    बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नीलडोह परिसरात एका रिकाम्या प्लॉटमध्ये महिलेचा मृतदेह पडलेला दिसल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सुरू केला. आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता, या महिलेची कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही.

    ठाण्यात NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण; घृणास्पद प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया, कॉलेजच्या प्राचार्या म्हणाल्या…
    त्यानंतर पोलिसांना या महिलेची ओळख पटवणे तर सोडाच, पण या हत्येचे गूढ उकलणेही मोठ्या आव्हानापेक्षा कमी नव्हते. तपासात पोलिसांना महिलेच्या हातावर सिद्धार्थ नाव कोरलेले दिसले. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी झाडाझुडपांमध्ये एक पिशवी सापडली ज्यामध्ये महिलेची साडी, जेंट्स पँट आणि दागिन्यांचा बॉक्स आढळून आला. या बॅगेत महिलेची ओळख होईल असे काहीही आढळून आले नाही.

    राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय; शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होणार, कुठे मिळणार मोफत उपचार
    त्याचवेळी पँट वरील टेलरचे स्टिकर पोलिसांच्या नजरेस पडले. हे स्टिकर फ्रेंड्स टेलरचे होते ज्याचा पत्ता लाखनी भंडारा असा आहे. तसेच मृत महिलेच्या हातावर सिद्धार्थ हे नाव कोरले होते. या दोन सुगावाच्या आधारे एमआयडीसी पोलिसांचे पथक लाखनी भंडारा येथे पोहोचले आणि पँट बाबत विचारणा केली असता टेलरने ते बोरगाव लाखनी येथे राहणाऱ्या सिद्धार्थ मेश्रामचे असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीच्या घरी पोहोचून चौकशी केली असता आरोपी सिद्धार्थ मेश्राम घरातच पोलिसांच्या हाती लागला.

    महिलेच्या पहिल्या पतीचे निधन

    मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये महिलेच्या पहिल्या पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. यानंतर ती वडिलांसोबत राजू नगर येथे राहू लागली. यादरम्यान तीची आरोपी सिद्धार्थशी ओळख झाली. सिद्धार्थ हा हात मजुरीचे काम करायचा. हळुहळु भेटीगाठी पुढे वाढत गेल्या, मग दोघे एकत्र राहू लागले. गेल्या आठ वर्षांपासून ती सिद्धार्थसोबत लाखनी येथील त्याचा घरी राहत होती.

    शाळा सुटली चिमुकली घराकडे निघाली, वाटेतच काळाची झडप; आईच्या डोळ्यांदेखत ४ वर्षाच्या मुलीचा अंत
    महिनाभरापूर्वी शिल्पा आणि सिद्धार्थमध्ये घरखर्चावरून वाद झाला होता. यादरम्यान सिद्धार्थने शिल्पाला मारहाण केली. यानंतर मृत महिला आपल्या वडिलांच्या घरी परत येऊन राहायला लागली. मात्र, यावेळी शिल्पा सिद्धार्थच्या सतत संपर्कात होती. गेल्या आठवड्यात सिद्धार्थ तिला भेटायला आला होता. यादरम्यान शिल्पाने त्याच्याकडे खर्चासाठी पैसे मागितले होते, मात्र सिद्धार्थने पैसे नसल्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये पैशावरून भांडण झाले.

    बुधवारी पुन्हा एकदा आरोपी सिध्दार्थ तिला भेटायला आला. यादरम्यान त्याने तिला बोलण्यास सांगून नीलडोह परिसरामध्ये नेले आणि पुन्हा एकदा शिल्पाने त्याच्याकडे खर्चासाठी ५ हजार रुपये मागितले, मात्र सिद्धार्थने देण्यास नकार दिला. पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. आरोपींनी सोबत आणलेल्या शस्त्राने शिल्पावर हल्ला करून तिची हत्या केली आणि तेथून पळाला. एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

    कर्जत तालुक्यात माझी एकही गुंठा जमीन नाही, असल्यास मी सरेंडर करेन, पवारांचे आरोप राम शिंदेंनी खोडून काढले!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed