• Sat. Sep 21st, 2024

बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, डोक्यावर केस नाही, भुवया काढलेल्या, गूढ वाढले

बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ, डोक्यावर केस नाही, भुवया काढलेल्या, गूढ वाढले

रत्नागिरी : दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या २४ वर्षीय बेपत्ता तरुणीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चार-पाच दिवसांपूर्वी तिच्या घरच्यांनी दापोली पोलिस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दापोली येथून चिपळूण तालुक्यात ओमळी या आपल्या गावी जाते सांगून निघालेल्या नीलिमा सुधाकर चव्हाण हिचा बुडून झालेला मृत्यू हा नेमका कशामुळे झाला किंवा तिने आत्महत्या केली किंवा कसे हे गूढ अद्याप कायम आहे.
मी गावी जाते आहे हे शब्द अखेरचे ठरले, बेपत्ता २४ वर्षीय युवतीचा मृतदेह सापडल्याने खळबळ
दरम्यान, या प्रकरणी नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नातेवाईक आणि नाभिक समाज बांधवांकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. नीलिमा ही खेड चिपळूण या एसटी बसमध्ये बसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहे. तसेच ती एका मुलीबरोबर बसून दापोली एसटी बसमधून खेड येथे उतरल्याचे दिसत आहे. तर यावेळी एक तरुण तिला भेटला होता. हा तरुण आणि ती मुलगी नीलिमाला का भेटले? याची माहिती पोलीस घेत आहेत. मृतदेह आढलून आला त्यावेळी नीलिमाच्या डोक्यावरती केस नव्हते. भुवयावरती केस नव्हते. त्यामुळे हे सगळे प्रकरण आता संशयास्पद बनले आहे. त्यामुळे या मुलीला भेटलेला तो तरुण कोण? याची माहिती आता पोलिसांकडून घेण्याचे काम सुरू आहे.
Crime News : कोकणात फार्म हाऊस अन् इमारतीत पोलिसांचा छापा, दरवाजा उघडून खोलीत शिरताच फुटला घाम…
या प्रकरणी चिपळूणचे आमदार शेखर निकम आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनीही हा विषय चालू अधिवेशनात सभागृहात मांडला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडून युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी पोलिसांच्या विविध यंत्रणांची पथके तपास करत आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर आणि टेम्पोचा भोस्ते घाटात अपघात, ३ जण जखमी

दापोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कंत्राटी कर्मचारी निलीमा सुधारकर चव्हाण (वय २४ रा. ओमळी, ता. चिपळूण) या शनिवारी २९ जुलैपासून बेपत्ता झाल्याने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास शीघ्रगतीने व्हावा यासाठी चिपळूण येथील महिलांनी, तरुणीनी कॅन्डल मार्च काढत पोलिसांची भेट घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed