• Mon. Nov 25th, 2024

    कुख्यात गुंडाचा भाजपमध्ये प्रवेश; पोलिसांनी भर बाजारात काढली होती धिंड, कोण आहे अज्जू ठाकूर?

    कुख्यात गुंडाचा भाजपमध्ये प्रवेश; पोलिसांनी भर बाजारात काढली होती धिंड, कोण आहे अज्जू ठाकूर?

    अकोला : अलिकडे विरोधक भाजपवर ‘वॉशिंग मशिन’ म्हणून टीका करतात. गंभीर आरोप असलेला माणूस भाजपमध्ये आला की पवित्र होतोय, असंही म्हटलं जातंय. त्यात अकोल्यात भाजपमध्ये सोमवारी झालेला एक प्रवेश असाच गाजतोय. हा प्रवेश आहे अजय उर्फ अज्जू ठाकूर याचा.

    अकोल्यातील भाजप कार्यालयात सोमवारी अज्जू ठाकूर याचा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झालाय. अज्जू ठाकूर हा अकोल्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातोय. त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये मारहाण, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
    अकोला हादरलं! तरुणी अचानक घरातून बेपत्ता, सगळीकडे शोधाशोध, आता धक्कादायक बातमी आली समोर
    दरम्यान, सोमवारी टोपले सभागृहात भाजप कार्यालय इथे अजय ठाकूर, मोहिनी ठाकूर, प्रीती गावंडे, विश्व माला वाणी, किरण इंगळे, सागर गायकवाड, प्रशांत इंगळे, मनोज पारस्कर, मंगेश राजपूत, किरण पांडे, निलेश मोरे, वैभव उंबरकरसह बहुसंख्य महिला आणि तरुणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर विजय अग्रवाल, महानगर अध्यक्ष मसने अनुप, धोत्रे, अनिल नावकार, मिलिंद राऊत उपस्थित होते. दरम्यान अजित ठाकूर याच्या भाजप प्रवेशानंतर सोशल मीडियावर चांगला ट्रोल होत आहे.
    पत्नी घरात बेशुद्धावस्थेत पडली होती, पती उठवायला गेला अन् त्यानेही प्राण सोडले; दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
    अज्जू ठाकूर नेमका कोण?

    अज्जू ठाकूर हा अकोला शहरातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातोय. त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये मारहाण, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. साडेतीन वर्षांपूर्वी म्हणजेच अकोला पोलिसांनी १८ एप्रिल २०२० जठारपेठ आणि उमरी भागात गुंडागर्दी करणाऱ्या अज्जू ठाकूर याची रस्त्यानं धिंड काढली होती. एरवी गुंडागर्दी आणि दादागिरी करणारा अज्जू ठाकूर यावेळी चक्क रडताना अकोलेकरांना दिसला.

    अकोल्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल; पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास

    अकोल्यातील कुख्यात गुंड अज्जू ठाकूरच्या टोळीनं जिल्ह्यातील ग्रामीण भागात अक्षरश: खोटे पोलीस बनत उच्छाद मांडला होता. १४ एप्रिल २०२० च्या रात्री या टोळीनं धोतर्डी गावात पोलीस असल्याचं सांगत गावकऱ्यांना मारहाण केली होती. यानंतर गावकऱ्यांनी या गुंडांना पकडून चांगलाच चोप दिला होताय. या टोळीनं जिल्ह्यातील यावलखेड, धोतर्डी, दहीगाव गावंडे, सांगळूद, एकलारा, घुसर, चाचोंडी या गावांत आपली दहशत पसरवली होती. या टोळीतील अज्जू ठाकूरसह चार जणांवर तेव्हा बोरगाव पोलीसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्याला भरचौकात पोलीसी पाहू़णचारही देण्यात आला होता. आता भाजपात प्रवेश केल्यानंतर अज्जू ठाकूरचा ‘वाल्याचा वाल्मिकी’ होईल का?, असा प्रश्न विचारला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *