सभागृहामध्ये औरंगजेबाबद्दल चर्चा सुरू असताना महेश लांडगे हे प्रश्न विचारण्यासाठी उठले असताना त्यांनी प्रश्न उपस्थित करत असताना ” जो औरंगजेबाला मानतो त्याचा शिवाजी महाराजांना मानण्याचा संबंध काय? सभागृहात आलेला प्रत्येक सदस्य हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे. जो कुणी मानत नसेल त्यांनी हात वर करावा, आणि जर मानत असेल तर त्याचा औरंगजेबाला मानण्याचा संबंध काय? ज्यांनी आमच्या राराजाला छळलं आमच्या प्रजेला छळलं त्याला मानण्याचा संबंध काय असे देखील महेश लांडगे म्हणाले. तेव्हा अध्यक्ष महोदय अशा डोक्यात असणाऱ्या विकृतीना आपल्याला थांबवावे लागेल. यावर आपण काय कारवाई करणार असा प्रश्न महेश लांडगे यांनी उपस्थित केला. मात्र, महेश लांडगे यांच्या या रुद्रावताराने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते. मात्र, महेश लांडगे यांच्या या रुपाने रमेश वांजले यांच्या २०१२साली अबू आझमी यांच्या हिंदीतून शपथ घेताना माईक हिसकावल्याच्या प्रसंगाची आठवण झाली.
यावेळी नितेश राणे आणि अबु आझमी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नंबरचा शत्रू होता, त्या औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवले गेले. औरंगजेबावर एवढं प्रेम असेल तर त्यांना पाकिस्तानला पाठवून द्या, असे नितेश राणे यांनी सभागृहात म्हटले. यावेळी नितेश राणे अबु आझमी यांच्याकडे पाहून हातवारे करत होते. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.