• Sat. Sep 21st, 2024
वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; CSMT-शिर्डी, सोलापूर गाड्या  या स्थानकांवर थांबणार

मुंबई: वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. रेल्वे बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या दोन गाड्यांना नवे थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती मध्य रेल्वेने आज बुधवारी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत गाडी क्रमांक २२२२३/२२२२४ या गाडीला कल्याण स्थानकात थांबा दिला जाणार आहे. ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून ही गाडी शिर्डीसाठी निघाल्यानंतर सकाली ७ वाजून १६ मिनिटांनी कल्याण स्थानकावर पोहोचेल. तर शिर्डीवरून येताना रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी कल्याण स्थानकात पोहोचेल. सध्या या गाडीला दादर, ठाणे, नाशिक रोड या ठिकाणी थांबा आहे. ही गाडी सीएसएमटीवरून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी निघते आणि दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी शिर्डीला पोहोचते. तर शिर्डीवरून संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी निघते आणि रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात पोहोचते.

सीएसएमटी स्थानकावरून सोलापूरला जाणारी गाडी क्रमांक २२२२५/२२२२६ या गाडीला ठाणे स्थानकात थांबा दिला जाणार आहे. ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून निघाल्यानंतर ठाणे स्थानकात दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांनी पोहोचेल. तर सोलापूरवरून सीएसएमटी स्थानकाकडे येताना ही गाडी ठाणे स्थानकात रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. सध्या या गाडीला दादर, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी येथे थांबा आहे. ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून दुपारी ४ वाजून ०५ मिनिटांनी निघते आणि सोलापूरला रात्री १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचते. तर सोलापूरवरून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी निघून सीएसएमटी स्थानकात दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचते.

CSMT ते शिर्डी आणि CSMT ते सोलापूर या दोन्ही गाड्यांचे नवे थांबे ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत, असे मध्य रेल्वेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

साईबाबा मंदिर तर आवडलं पण बाबांचा महाप्रसादही ‘लय भारी’, राष्ट्रपतींकडून आचाऱ्यांना राजधानी दिल्लीचं निमंत्रण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed