• Sat. Sep 21st, 2024

खर्रा थुंकताना तोल गेल्याचा संशय, हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून रुग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू

खर्रा थुंकताना तोल गेल्याचा संशय, हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून रुग्णाच्या नातेवाईकाचा मृत्यू

नागपूर : नागपूर मधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने नागपूरमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून दिगंबर हिरुळकर (वय ५२) असे मृतकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुलढाना जिल्ह्यातील हिवरखेड येथील रंजना या महिलेला शनिवारी सायंकाळी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते. तिच्यासोबत तिची बहीण मंगला व बहिणीचे पती दिगंबर हिरुळकर हे देखील आले होते. मात्र बाह्य रुग्ण विभागाची वेळ संपल्यामुळे मंगला व दिगंबर हिरुळकर यांनी सुरक्षा रक्षकाला रात्री तिथेचं मुक्काम करू देण्याची विनंती केली.

नागपूर हादरले, मित्रांबरोबर पीत बसला होता, वादानंतर मित्राने तरुणाचा निर्दयीपणे जीव घेतला
रात्री जवळ जवळ एक वाजताच्या सुमारास दिगंबर हिरुळकर खर्रा थुंकण्यासाठी म्हणून गेले असता त्यांचा अचानक पणे तोल जाऊन ते खाली कोसळले. मोठा आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकांनी लगेचं त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर लगेच दिगंबर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपाचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिगंबर हे एका पायाने अपंग होते, त्यामुळे त्यांना कृत्रिम पाय लावण्यात आला होता.

संभाजी भिडे गुरुजी हिंदुत्वासाठी काम करतात, बहुजनांना शिवरायांशी जोडतात, पण…. फडणवीसांच्या वाक्याने गदारोळ

मात्र काहींच्या मते तिसऱ्या मजल्यावर सर्वत्र काचा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथून थुंकता येत नाही. रात्री कुटुंबात काही कारणांवरून वाद झाले व त्यातून दिगंबर यांनी काच तोडून खाली उडी घेतली असण्याची शक्यता व्यक्त केली जातं आहे. तसेच मृतक मानसिक रुग्ण असल्याची ही माहिती समोर आली आहे. तरीही अजनी पोलीस या सर्व घटनेचा तपास करीत आहेत. २०२१ मध्येही याच रुग्णालयात दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन दोन जणांनी आत्महत्या केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed