• Mon. Nov 25th, 2024

    नाशिकात वाहनचोरीचं सत्र सुरूच; आता भामट्यांना बसणार आळा,पोलीस राबवणार नवीन पॅटर्न

    नाशिकात वाहनचोरीचं सत्र सुरूच; आता भामट्यांना बसणार आळा,पोलीस राबवणार नवीन पॅटर्न

    नाशिक: नाशिक मध्ये अल्पावधीतच अधिक पैसे मिळविण्याच्या हव्यासातून शहरात मोठ्या प्रमाणात वाहनचोरीचे सत्र सुरु आहे. हॉटेल्स, अपार्टमेंट, कंपन्यांच्या पार्किंगमधून वाहनांची चोरी जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येते. गेल्यावर्षीच्या तुलनेत ह्यावर्षी १६ वाहनांची चोरी अधिक झाली असून, पोलिसदप्तरी सहा महिन्यांतच ३८४ दुचाकी चोरीला गेल्याची नोंद आहे. त्यामुळे वाहन चोरीचा ‘गीअर’ सुसाट असल्याचे अधोरेखित झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत ३८४ पैकी ३५ वाहने शोधण्यात पोलीस यशस्वी झाले, असले तरी जानेवारी ते जून या कालावधीत चोरी झालेली वाहने शोधण्याचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत काहीसे घटले आहे.

    २०२२ मध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे शोधण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्तांनी स्वतंत्र पथके नेमली होती. परिणामी, गुन्ह्यांची उकल झपाट्याने होत असताना यावर्षी ही पथके बंद करण्यात आली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे विभागातील पथकांवर या गुन्ह्यांची उकल करण्याची जबाबदारी आहे. इतर गंभीर गुन्ह्यांचा शोध सुरू असल्याने वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात अडथळे येत असल्याचे चित्र दिसून येते.

    ए भाई, ज़रा देखके चलो पीछे ही नहीं आगे भी…; नाशिककांना खड्ड्यांनी आणले नाके नऊ, दिलासा कधी?
    दरम्यान, गुन्हेगारीतही आता ग्रामीण-शहर हा ‘पॅटर्न’ वापरला जात असल्याचे गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शहरातल्या दुचाकींचे क्रमांक, पार्ट बदलून त्या थेट ग्रामीण भागात नेल्या जातात.

    यासह अगदी किरकोळ किमतीत दुचाकी विक्री करून त्यातून मिळणाऱ्या रकमेतून संशयित मौज करतात. यामध्ये १८ ते ३० या वयोगटातील संशयितांचा समावेश असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलिसांना संशयितांपर्यंत पोहचणे अवघड होत आहे. त्यासाठी सराईत आणि तुलनेपेक्षा अधिक पैसे खर्च करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.
    Nashik Hospital: धक्कादायक! उजव्या पायातील रॉड काढायला गेला, डॉक्टरने डाव्या पायाचं ऑपरेशन केलं, वैतागलेल्या रुग्णाने…
    वर्ष – वाहनचोरी – शोध
    २०१८ – ५६९ – १५५
    २०१९ – ५०५ – १०५
    २०२० – ४१७ – ७०
    २०२१ – ५२४ – ९४
    २०२२ – ७३८ – १४६
    २०२३ – ३८४ – ३५

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *