• Thu. Nov 28th, 2024

    Pune Rain News : पुण्यात जुलैमध्ये समाधानकारक पाऊस, सरासरी गाठण्यात अपयश, तूट भरुन निघणार?

    Pune Rain News : पुण्यात जुलैमध्ये समाधानकारक पाऊस, सरासरी गाठण्यात अपयश, तूट भरुन निघणार?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली, तरी जुलैमध्ये समाधानकारक हजेरी लावून पावसाने पुणे जिल्ह्यातील तूट भरून काढली. शिवाजीनगर वगळता शहराच्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाल्याची नोंद भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) केली आहे. पुण्यात या हंगामात जून आणि जुलै महिन्यात २३८.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, सरासरी गाठण्यात यश आले नाही.

    पुण्यासह मध्य महाराष्ट्रात यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धरला; पण सरासरी गाठता आली नाही. संपूर्ण जून महिन्यात ७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाळ्यात जुलै महिना हा सर्वाधिक पावसाचा नोंदवला जातो. त्यामुळे नागरिकांनाही जोरदार पावसाची अपेक्षा होती. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जुलैमध्ये मात्र पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. अनुकूल वातावरणामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस १५ दिवस सक्रिय राहिला. जिल्ह्यात चांगल्या पावसाची नोंद झाली. मात्र, शहरात पावसाची केवळ रिपरिप होती. महिनाभरात केवळ दोन दिवस सलग २४ तासांत २० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. उर्वरित बहुतांश दिवस पाऊस १० मिमीपेक्षा कमीच पडला. याउलट घाट माथ्यमावर लक्षणीय पाऊस पडला. एरवी पुण्यात जून आणि जुलै महिना एकत्रित सरासी ३४० मिमी पाऊस पडतो. या वर्षी ९८.६ मिमी कमी पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यातील पाऊस सरासरी भरून काढतानाच पहिल्या दोन महिन्यांची तूट भरून काढणार का, याचे पावसासाठी पोषक वातावरणावर अवलंबून आहे.
    स्टुअर्ट ब्रॉडने जाता जाता अनोखा विक्रम केला नावे, अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला
    जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती; पण वातावरणातील अनुकूल बदलांमुळे जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यात, उपनगरांत, घाट माथ्यावर समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात शिवाजीनगर भाग वगळता इतरत्र चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यांच्या सरासरीतील तूट कमी झाली आहे, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी म्हटलं.
    सावध व्हा! आजकाल मोबाईल नंबर आणि लोकेशनच्या मदतीने होत आहे ऑनलाईन फ्रॉड, वाचा नेमकं प्रकरण काय?
    दरम्यान, भारतीय हवामान विभागानं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचं म्हटलं आहे.

    विजय वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा, काँग्रेसचा डबलगेम, बालेकिल्ल्यातून भाजपवर चढाई

    मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा मोठी दरड कोसळून मातीचा ढिगारा रस्त्यावर, मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed