• Mon. Nov 25th, 2024

    पतीला मोठी चक्कर आली आणि रुग्णालात झाला मृत्यू; पोलिसांनी गुप्त तपास केला अन् समोर आलं धक्कादाक सत्य

    पतीला मोठी चक्कर आली आणि रुग्णालात झाला मृत्यू; पोलिसांनी गुप्त तपास केला अन् समोर आलं धक्कादाक सत्य

    दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत पोलिसांकडून एका आकस्मित मृत्यू झालेल्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. यवत पोलीस ठाण्यात ३९ वर्षीय संतोष पवार (सध्या या.चौफुला नवेगाव, मूळ रा.कडेठाण ता.दौंड) याचा आकस्मित मृत्यू झाल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. सदर घटनेचा यवत पोलिसांनी गुप्त पद्धतीने केलेल्या तपासात पत्नी पल्लवी संतोष पवार (वय २८ रा.चौफुला,नवागाव,दौंड ) तिने ८ दिवसांपूर्वी केलेल्या मारहाणीमुळेच पती संतोष पवार याचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

    सदर घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दोन महिन्यांपूर्वी संतोष आणि पल्लवी हे दोघे कामाच्या शोधात दौंड तालुक्यातील चौफुला येथील नवागाव गावात राहण्यासाठी आले होते. संतोष याला दारूचे व्यसन असल्याने पत्नी पल्लवी त्याला वारंवार समजावून सांगून ही तो दारू पिणे कमी करत नव्हता. दिनांक २२ जुलै रोजी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास संतोष पुन्हा दारू पिऊन घरी आला. यावेळी चिडलेल्या पत्नी पल्लवीने त्याला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. हातापायावर मारहाण होत असतानाच एक फटका पती संतोष त्याच्या डोक्याला लागला होता.

    छत्रपती संभाजीनगर हादरले; स्वयंपाकाची तयारी सुरू असताना अचानक दाम्पत्यावर घरात घुसून गोळीबार
    पुढे एक-दोन दिवसानंतर संतोष याला चकर येणे, उलट्या होणे असा प्रकार सुरू झाला. दिनांक ३० जुलै रोजी त्याला अशीच मोठी चक्कर आल्याने त्यास ससून येथे नेले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. त्याचा आकस्मित मृत्यू झाला असावा, असे सर्वांना वाटत होते. तशी माहिती यवत पोलिसांना देण्यात आली. मात्र यवत पोलीस ठाण्याचे केशव वाबळे यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाळासाहेब गाडेकर, विशाल जाधव, सोमनाथ सुपेकर, कापरे, महिला पोलीस चाफळकर या टीमच्या साह्याने अधिक तपास सुरू केला.

    सदर तपासात संतोष याचा मृत्यू पत्नी पल्लवीने केलेल्या मारहाणीत झाल्याची गुप्त माहिती मिळाली. दरम्यान संतोष याचा श्वविच्छेदनाचा अहवाल ही आला. सदर अहवालात संतोषचा मृत्यू डोक्याला मार लागल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे आणि त्यांच्या टीमने महिला पोलिसांना सोबत घेऊन पल्लवी पवार हिला राहत्या घरातून अटक केली.

    पत्नी अन् पुतण्याला संपवलं, पोलिस अधिकाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed