• Mon. Nov 25th, 2024
    भिडेंवरून राज्यात वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले, म्हणाले- आम्ही…

    नागपूर: शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    लडाखच्या त्रिशूल युद्ध स्मारकाला शिंदे सरकारची रसद, तीन कोटींचा धनादेश लष्कराला सुपूर्द
    संभाजी भिडे यांच्या अटकेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. सरकार ही बाब गांभीर्याने घेत आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल. याप्रकरणी सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असताना इतर पक्षांनी आंदोलन करण्याचा प्रश्नच येत नाही. भिडे यांच्या अटकेबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, याप्रकरणी नियमानुसार जी काही कारवाई होईल, ती आम्ही करू, असे फडणवीस यांनी काल सांगितले आहे.

    जन्मत: च मणका नाही, फक्त २ महिनेच जगेल असं भाकित; तिच लेक आज १२ वर्षांची, घरची लक्ष्मी ठरली

    बावनकुळे पुढे म्हणाले की, भिडे हे भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना भाजपशी जोडलेला दुवा अजिबात योग्य नाही. भिडे यांचे स्वतःचे व्यक्तिमत्व आणि स्वतःचे मत आहे. ज्याचा भाजपशी काहीही संबंध नाही. विरोधी पक्षांच्या कामगिरीबाबत ते म्हणाले, “राजकारण करणे विरोधी पक्षाचे काम आहे. तेव्हा सरकारने आपली भूमिका स्पष्ट करून योग्य ती कारवाई करू, असे सांगितले आहे. त्यामुळे आपण त्याची वाट पहावी असे मला वाटते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed