औरंगाबाद, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध उपक्रमाच्या माध्यमातून महसूल विभागामार्फत नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आज महसुल सप्ताहाच्या शुभांरभ पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरणाने जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, रोहयोचे उपायुक्त डॉ.अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसिलदार विजय चव्हाण, महसुल विभागाचे अधिकारी आणि लाभार्थी नागरिकांची उपस्थिती होती.
पालकमंत्र्याच्या हस्ते दशरथ तुळशीराम म्हस्के, कडू बिरहाम शहा, अप्पासाहेब पिराजी पाबळे, दुर्गा मांगीलाल भाटी यांना संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ अनुदान योजनेचा लाभ देण्यात आला. आदित्य पेरकर, तेजस शेमवल आणि अक्षय डिघुळे यांना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
पालकमंत्री यांनी महसूल सप्ताहनिमित्त विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. महसुल सप्ताह विविध उपक्रमातुन यशस्वी करावा. सर्व सामान्यांसाठी लागणाऱ्या विविध दाखले, प्रमाणपत्र, फेराफार अदालत, पीक कर्ज, पीक विमा इ.कामासाठी लागणारा सातबारा, 8-अ चा उतारा याचे वितरण महसुल सप्ताहाच्या निमित्ताने वितरण करावे, असे मंत्री भुमरे यांनी सांगितले.
महसूल सप्ताहनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन
महसूल सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबविला जाणार आहे. 1 ऑगस्ट रोजी महसुल दिन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 अंतर्गत ई-हक्क् पोर्टलवर विविध प्रकरणे स्विकारणे व आदेश निर्गमित करणे. 2 ऑगस्ट रोजी युवा संवादच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध दाखल्याचे वितरण, आधार कार्ड दुरस्ती, अनाथ असल्याचे प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार.
3 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध कामासाठी लागणारा सातबारा 8-अ उतारा, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विषयी जाणीव जागृती, तालुक्यातील दुर्गम भागात महसुल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. 4 ऑगस्ट रोजी जनसंवादाच्या माध्यमातून सलोखा योजनांची अंमलबजावणी व आणि महसुल अदालतीमध्ये कलम 155 प्रलंबित तक्रार प्रकरणात कार्यवाही करुन निपटारा करणे. 5 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील प्रलंबित प्रकरण आणि संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढले जाणार आहे.
6 ऑगस्ट रोजी अधिकारी कर्मचारी संवाद कार्यक्रमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बांबीचा प्रकरणाचा निपटार करणे. या गोष्टीचा अंतर्भाव असुन 7 ऑगस्ट रोजी महसुल सप्ताहाचा समारोप कार्यक्रम आयोजित करुन सप्ताहाच्या फलनिष्पतीचा अहवाल सादर करणे, अंर्तभूत आहे.
000000