मुंबई, दि. ३१ : राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. सन २०२३-२४ या वर्षासाठी या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्यास १० ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण अर्ज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयास करावे. ज्या मदरशांना स्कीम फॉर प्रोव्हायडिंग क्वालिटी एज्युकेशन इन मदरसा (SPQEM) या पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभ मिळाला आहे, अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
****
शैलजा पाटील/विसंअ/