• Sat. Sep 21st, 2024
शाळेची चुकीची माहिती दिली, बावळेवाडीचे लोक म्हणाले, आमदारसाहेब आता गावात पाऊल ठेवायचं नाय…

शिरूर, पुणे : शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी शाळेबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती विधानसभेत दिल्याचा आरोप करत शिरुरचे आमदार अशोक पवार यांना वाबळेवाडी ग्रामस्थांनी गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आमदारांना गावबंदी केलीये. वाबळेवाडीची शाळा विद्यार्थ्यांकडून २५ हजार रुपये घेऊन शाळेत प्रवेश देते, सगळ्या धनिकांच्या मुलांना तिथे प्रवेश मिळतो, गोरगरिबांच्या मुलांना प्रवेश मिळत नाही, असे गंभीर आरोप आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत केले. त्यांच्या आरोपानंतर वाबळेवाडीचे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आमदार पवार यांना थेट गावबंदीच केली आहे.

वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी तातडीने ग्रामसभा घेऊन अशोक पवार यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. तसेच या पुढे जर वाबळेवाडीविरोधात बोललात तर आपल्या विरोधात आंदोलन करून प्रतिमेला जोडे मारण्याचा इशारा देखील या ग्रामस्थांनी दिला आहे.

राज्यात पावसाचा धुमाकूळ, शेतकरी छोट्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा
अशोक पवार यांचे प्रसिद्ध वाबळेवाडीच्या शाळेवर गंभीर आरोप

वाबळेवाडीच्या शाळेत विद्यार्थ्यांकडून २५ हजार रुपये घेऊन प्रवेश दिले जातात. तसेच मुख्याध्यापकांसह हे पैसे बाहेरच्या दोन व्यक्ती स्वीकारत असल्याचा आरोप अशोक पवार यांनी विधानसभेत बोलताना केला. सीएसआर मार्फत होणाऱ्या कामाच्या फंडाचा हिशोबही वाबळेवाडीची शाळा जिल्हा परिषदेला देत नसल्याचं पवार म्हणाले. तसेच या शाळेत १०-२० मुलेच स्थानिक असून अन्य मुले ही धनदांडग्या व्यक्तींची असल्याचा दावा पवार यांनी केला होता.

धडाकेबाज IAS अधिकारी हर्डीकर यांची २ महिन्यातच मुंबईतून नागपूरला बदली
आमदार पवार यांनी विधानसभेत बोलताना ही सगळी चुकीची आणि संभ्रम निर्माण करणारी माहिती दिलीये. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन वाबळेवाडीविरोधात राग आमदारसाहेबांनी आळवला, आता त्यांना आमच्या गावात प्रवेश नाही, असा पवित्राच ग्रामसभेनंतर वाबळेवाडीच्या लोकांनी घेतलाय.

ग्रामस्थ चूल बंद ठेवून कडकडीत उपवास करणार

आमदार अशोक पवार यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या कामाला प्रोत्साहन देण्याऐवजी ठरवून बदनामी करून लोकप्रतिनिधींच्या धर्माला गालबोट लावले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या उरलेल्या कार्यकाळात वाबळेवाडी आणि शिक्रापूर गावच्या हद्दीत प्रवेशास बंदी घालण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी जाहीर केले. याचा निषेध म्हणून आज वाबळेवाडी ग्रामस्थ चूल बंद ठेवून कडकडीत उपवास करणार आहेत. तसेच ७०० विद्यार्थ्यांना घरी ठेवून या घटनेचा निषेध करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed