• Sat. Sep 21st, 2024

स्थानिक वैदूच्या उपचारांमुळे गर्भवतीला झालेला त्रास, इगतपुरी प्रकरणात आरोग्य विभागाचा दावा

स्थानिक वैदूच्या उपचारांमुळे गर्भवतीला झालेला त्रास, इगतपुरी प्रकरणात आरोग्य विभागाचा दावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : इगतपुरी तालुक्यातील जुनवणे गावातील गर्भवती महिलने स्थानिक वैदूकडे काही औषधोपचार घेतले. तिचा मृत्यू हा प्रसूती वेदनांमुळे झाला नसल्याचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी (दि. २७) दिली.

खराब रस्त्यामुळे गर्भवती महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचण्यास उशिर झाला. त्यामुळे तिचा आणि पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली. या महिलेचा मृतदेह गावी झोळीतूनच परत न्यावा लागल्याने या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. या प्रकरणाबाबत आरोग्य विभागाने अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. संबंधित महिलेचा मृत्यू हा प्रसव वेदनांमुळे झालेला नाही. वैदूकडून घेतलेल्या औषधोपचारानंतर तिला उलट्या आणि प्रसूतीपूर्व झटके आल्याचे या अहवालात नमूद केले आहे. संबंधित महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. महिलेच्या प्रसूतीची तारीख सप्टेंबर महिन्यातील होती. आरोग्य केंद्रावर केलेल्या तिच्या सर्व चाचण्यांचे अहवाल साधारण होते, अशी माहितीही जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली.

एक रुपयात विमा, वेग मात्र धीमा; पीकविमा नोंदणीत तांत्रिक अडथळेच फार, शेतकऱ्यांची कसोटी!

तळोघ ग्रामपंचायत हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना जवळपास अडीच किलो मीटर कच्च्या रस्त्याने प्रवास करावा लागतो. हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला आहे. जुनवणेवाडी येथील वनिता भावडू भगत ( वय २३ ) या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्याने पहाटे अडीच वाजता दवाखान्यात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट केली. जास्तच त्रास होऊ लागल्याने तिला डोली करून त्यामध्ये झोपवण्यात आले. अखेर दवाखान्यात पोहोचल्यानंतर तिचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed