जव्हार : जव्हार तालुक्यात दुपारी पावसाने चांगलेच झोडपले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक छोटे मोठ्या नद्यांना पूर येऊन कित्येक गाव पाड्यांचा संपर्क तुटला असून, शाळकरी मुलांचे हाल झाले. तसेच वडोली येथील नदीला पूर आल्यामुळे जव्हार – सेलवास महामार्ग काही तास बंद होता. तर जव्हार विक्रमगड येथील उंबरवांगण येथील मोरीला पूर येऊन हा महामार्ग सुध्दा काही तास बंद होता. तर खेडोपाड्यातील शेकडो मोऱ्याना पूर येऊन कित्येक गाव पाडे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले होते.
तर पोंडीचापाडा लेंडी नदी व वनवासी येथील नद्यांना पूर येऊन हे दोन्ही मार्ग बंद होते. पावसाचं जोर इतका होता की, अक्षरशः नदी, नाले, दुथडी भरून वाहत होते, तर खोल रस्त्यावर सुध्दा दोन ते तीन फूट पाणी भरले होते.

पालघर जिल्ह्याला सुध्दा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट घोषित केला होता. मात्र शाळांना सुट्टी न दिल्यामुळे शाळा नियमित सुरू होत्या. सकाळी पाऊस कमी होता, मात्र दुपारनंतर पावसाने जोर पकडला आणि सर्वत्र त्रेधतिरपीट उडवली होती. यात शाळकरी मुलांचे खूपच हाल झाले होते. कित्येक तास मुले पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट बघत अडकून पडले होते.
आपत्ती व्यवस्थापनाकडून मदतीसाठी संपर्क करण्यात आला होता. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अडचणीत भर पडली होती.