• Sat. Sep 21st, 2024
कुटुंबीयांनी मुलीचे लग्न दुसरीकडे जुळवले,  प्रियकर भडकला, होणाऱ्या नवऱ्यावर केला हल्ला

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून तरुणीचे एका तरुणावर प्रेम होते. मात्र, या नात्याला विरोध करत कुटुंबीयांनी मुलीचे लग्न तिच्याच नात्यातील तरुणासोबत निश्चित केले. मात्र, हा प्रकार तिच्या प्रियकराला समजताच त्याने प्रेयसीच्या भावी पतीला चौकात थांबवून मारहाण केली आणि लग्न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या खिशातील दोन हजार रुपये हिसकावले. ही घटना तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुण अमन चावरे (२५) आणि त्याच्या भावाला अटक केली आहे. तर, त्याचा साथीदार फरार आहे. पीडित तरुण हितेश खासगी कंपनीत काम करतो.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणीचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरुणीच्या आईवडिलांनी या प्रेमप्रकरणास विरोध दर्शवला होता. त्यामुळे तिचे लवकरात लवकर दुसऱ्या युवकाशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न कुटुंबीयांनी केला होता.त्याने आपल्या मुलीचे लग्न नातेवाईक असलेल्या तरुणासोबत निश्चित केले. लग्न निश्चित झाल्यानंतर तरुणाच्या घरात तयारी सुरू झाली.मात्र, कोणत्याही स्थितीत प्रेयसीचे लग्न होऊ नये म्हणून अमन हा प्रयत्न करीत होता.

भेटीसाठी आलेले बराच वेळ ताटकळले, पण दिलीप वळसे पाटील यांनी या कृत्याने सर्वांची जिंकली मने
पीडित तरूण काही कामासाठी दुचाकीवरून जात होती. तर आरोपी अमन चावरे (२५)त्याचा भाऊ अंकित चावरे (२३) आणि त्याचा एक साथीदार पिडीत तरुणाचा पाठलाग करत होते. तरुण टिमकी चौकात येताच आरोपींनी त्याला घेराव घातला. आरोपींनी पीडितेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यावेळी आरोपींनी त्यांच्या खिशातून दोन हजार रुपये काढून घेतले. तिथे लग्न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

Dilip Shanghvi : पायपीट करत विकायचे औषधे, २००० रुपये कर्ज घेऊन सुरू केली कंपनी, आज २६०००० कोटींचा व्यवसाय
पीडित तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीसह त्याच्या भावाला गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू आणि लोखंडी रॉड सह अटक केली. तर एक आरोपी अजूनही फरार आहे, ज्याचा पोलीस शोध घेत आहेत.

रिलायन्सच्या ३६ लाख गुंतवणूकदारांसाठी मोठी खुशखबर, शेअरचे नवे टार्गेट पाहून बसेल धक्का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed