• Sat. Sep 21st, 2024

नवऱ्याबरोबर कामानिमित्त जात होती, वाटेतच काळाचा घाला, टँकरच्या धडकेत महिला जागीच ठार

नवऱ्याबरोबर कामानिमित्त जात होती, वाटेतच काळाचा घाला, टँकरच्या धडकेत महिला जागीच ठार

नवी मुंबई : शहरात अपघातांचे सत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेक वेळा वाहतुकीच्या नियमांच्या सूचना देऊनही काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत भरघाव वेगाने वाहने चालवत असतात. त्यामुळे अनेक वाहनचालकांची चूक नसतानाही त्यांना किंमत चुकवावी लागते. अशीच एक घटना नवी मुंबई येथील वाशी प्लाझा ब्रिजच्या रस्त्यावर घडली असून ह्या भीषण अपघातामध्ये एक स्त्री जागीच ठार झाली आहे.

सायन पनवेल मार्गावर वाशी येथील उड्डाणपुलावर टँकरच्या धडकेत मोटारसायकलवरील महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गोवंडी येथून खारघरकडे जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव टँकरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सायन पनवेल महामार्गावरील वाशी येथील उड्डाणपूलाजवळ असलेल्या अपघातामध्ये टँकर चालक हा पळून गेला आहे.

शहानवाज तय्यब सारंग हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून खारघर येथे कामानिमित्त जात होते. मात्र सायन पनवेल मार्गावरील वाशी प्लाजा येथील उड्डाणपूलावर त्यांच्या दुचाकीला भरधाव टँकरने पाठीमागून धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सिमीन सारंग या रस्त्यावर पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

एका दादांच्या एन्ट्रीने दुसऱ्या दादांचं विधानसभेचं गणित सोपं, भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीला पालवी फुटली!
दुचाकीला पाठीमागून धडक दिलेल्या टँकर चालकाने अपघात होताक्षणी घटनास्थळावरून पळ काढला. या भीषण अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला असून वाशी पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे-मोदींची भेट, अजितदादांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा, जयंत पाटलांचं ‘खास’ उत्तर
शहानवाज तय्यब सारंग हा दुचाकीने प्रवास करत होता. त्याच्या दुचाकीचा क्रमांक एम.एच.०३ ई. क्यू. ९०२६ ह्या दुचाकी वरून पत्नी सिमिन सोबत खारघर येथे जात असताना वाशी प्लाझा येथील ब्रिजवर मुंबई पुणे हायवे रोडवर वाशी येथे टँकर क्रमांक एम.एच.०४ के. यू. ३४९९हा भरधाव वेगाने चालवत असून त्या टँकर चालकाने रस्त्यावरील रहदारीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टँकर चालवत शहानवाज तय्यब सारंग याच्या मोटर सायकलने पाठीमागून धडक दिल्याने त्याच्या पत्नीस गंभीर स्वरूपाची दुखापत होवुन जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

जळगावात एसटीला ट्रकची धडक, १३ विद्यार्थ्यांसह २० प्रवासी जखमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed