पर्यावरणाच्या दृष्टीने जालनेकरांसाठी वेगाने विस्तारत असलेल्या पर्यटन स्थळांसाठी, जालन्यातील पारसी टेकडीच्या भरभराटीसाठी त्यांचे विशेष योगदान आहे. जालनेकर कधीच त्यांचे योगदान विसरू शकत नाहीत. त्यांनी स्वतः श्रमपरिहार करून शासकीय अधिकारी,कर्मचारी,उद्योजक,पत्रकार,सामान्य नागरिकांच्या सहकार्यातून पारसी टेकडी व जालना जिल्ह्यात मोठे वृक्षरोपनाचे तसेच विविध समाजउपयोगी कामे झाले आहेत.
जालना शहराला पाण्याचा प्रश्न नवा नाही. जिल्हाधिकारी राठोड यांनी कुंडलिका सिना नदीचे पूनरूज्जीवन करण्याच्या कामातही स्वतः श्रमदान आणि मार्गदर्शन केले. जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयाच्या साफ सफाईसाठी सुध्दा त्यांनी हिरारीने भाग घेतला होता त्यामुळे शहरातील नागरिकदेखील या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले. दर रविवारी पारशी टेकडीवर येऊन वृक्षारोपण करण्याचा रतीब त्यांनी काल नवीन जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांना दिल्यावर आजही पारसी टेकडीवर येऊन पार पडलाच. त्यामुळे भारावलेल्या नागरिकांनी आज डॉ.विजय राठोड यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना निरोप दिला.
जालना जिल्हा रेशीम शेतीमध्ये अग्रक्रमावर येण्यामध्ये डॉ.राठोड यांचे मोठे पाठबळ शेतकऱ्यांना मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याची रेशीम शेती पाहून त्यांना मार्गदर्शन केल्याने कित्येक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा मार्ग पत्करून लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे. डॉ.राठोड यांच्या अशा दूरदृष्टीमुळे जालना जिल्ह्याच्या ते सतत स्मरणात राहतील अशी भावना जालनेकरांनी व्यक्त केली.त्यामुळे काल आणि आजही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडांना निरोप देताना अनेकांना गहिवरून आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मागील वर्षभरापासून अनेक रविवारी पारसी टेकडीवर हजेरी लावून स्वतः वृक्षारोपन व श्रमदान केल्याने अनेकांना वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहान मिळाल्याने आज शहराजवळ घनदाट जंगल बनण्यास मदत होत आहे.