• Mon. Nov 25th, 2024

    श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; दिंगबराचा जयघोष, काय असतो हा सोहळा? वाचा सविस्तर

    श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; दिंगबराचा जयघोष, काय असतो हा सोहळा? वाचा सविस्तर

    कोल्हापूर: नृसिंहवाडी दत्त मंदिरात आज दुपारी १ वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. कृष्णेचे पाणी रविवार मंदिराच्या मंडपामध्ये आले होते. मात्र, पाणी संथ गतीने वाढत असल्याने दक्षिणद्वार सोहळा केव्हा होणार याकडे भाविकांचे लक्ष लागले होते. आज दुपारी १ वाजता श्रींच्या चरणकमला स्पर्श करून कृष्णा माई दक्षिणदार द्वारातून बाहेर पडल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. दिंगबरा दिंगबरा असा जयघोष करत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

    मंदिरात पाणी आल्याने दक्षिणद्वार सोहळा संपन्न:
    मागील आठवड्याभरापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी पंचगंगा पात्रा बाहेरून वाहत आहे. शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. यामुळे दरवर्षी पाणी वाढले की नदीचे पाणी येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिरात शिरत असते. यावर्षी प्रथमच नदीचे पाणी दत्त मंदिरात आले आहे. यामुळे यावर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा आज दुपारी १ वाजताच्या सुमारास मोठ्या उत्साहात पार पडला.

    कोल्हापुरातील राधानगरी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; पर्यटकांना वर्षा पर्यटनाचा मोह टाळण्याच्या सूचना

    दिंगबर दिंगबरा अशा जयघोषात भविकांनी या पाण्यात स्नानं केलं. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरामध्ये पोलिस बंदोबस्त आणि लाईफगार्ड तैनात करण्यात आले आहेत. दरवर्षी शिरोळ तालुक्याला सर्वात जास्त पुराचा फटका बसतो पुरात शिरोळ तालुक्यातील जवळजवळ ३६ गावे पुराच्या पाण्याखाली जात असतात.

    काय असतो दक्षिणद्वार सोहळा:

    श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आज संपन्न झाला. मागील आठवड्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच राधानगरी धरणातून सुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणत विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदी आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. कृष्णा नदीच्या पाण्याने शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील मंदिरातील दत्त पादुकांना स्पर्श केले.

    दत्त मंदिरात दुपारी नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रींच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडे बाहेर पडले. अशा प्रकारे वर्षातील हा पहिला ‘दक्षिणद्वार सोहळा’ संपन्न झाला. या दक्षिणद्वार सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी शेकडो भाविकांची येथे गर्दी होत असते. श्रीक्षेत्र नृसिंहवाडीतील दत्तात्रयाच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचे पाणी गेल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा होतो. मंदिराच्या उत्तरेकडील दरवाज्यातून पुराचे पाणी मंदिरात जाते व पादुकांवरुन वाहते. तसेच दक्षिणेकडील दरवाज्यातून बाहेर पडते. त्याला ‘दक्षिणद्वारा सोहळा’ असे संबोधले जाते.
    साताऱ्यातील उलटा धबधबा पाहण्यासाठी गेले, हुल्लडबाज तरुणांचा राडा, पती-पत्नीला मारहाण

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed