• Sat. Sep 21st, 2024

सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये दरड पडण्याचे सत्र सुरूच, राजगडाच्या बालेकिल्ल्यावर दगड कोसळली

सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये दरड पडण्याचे सत्र सुरूच, राजगडाच्या बालेकिल्ल्यावर दगड कोसळली

म. टा. प्रतिनिधी: पुणे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये वेगवेगळ्या भागात दरड पडण्याचे सत्र सुरूच असून शनिवारी राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला मार्गावर शनिवारी मोठे दगड कोसळले. पर्यटकांची वर्दळ कमी असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुढील काही दिवस राजगडावरील बालेकिल्यावर पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. आठवडाभर मुसळधार पडलेल्या पावसामुळे धोकादायक कड्यांवरून लहान मोठे दगड मुरूम पडणे, दरड कोसळ्याच्या घटना सुरू आहेत.

राजगडावरही बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर दुपारी उंचावरून कड्यावरून दगड निखळले. त्यामुळे बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट बंद झाली. गडावर मुसळधार पाऊस आणि धुके असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता तात्काळ बंद केला. सुट्टीचा दिवस असूनही गडावर पर्यटकांची फारशी वर्दळ नव्हती. दिवसभर पाऊस सुरू असल्याने रस्त्यावरील दगड बाजूला घेणे आणि वाट मोकळी करण्यास वेळ लागणार आहे.

अजून काही दगड खाली येतील की नाही, याचा अंदाज आता लावता येणार नाही. त्यामुळे राजगड पर्यटकांसाठी खुला राहिला तरी पुढील काही दिवस सुरक्षेचा उपाय म्हणून पर्यटकांना बालेकिल्ल्यावर पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती पुरातत्व विभागाने दिली आहे.
पुणे रायगडला जोडणाऱ्या वरंधा घाट बंदचे आदेश,वाहन चालक ऐकेनात..! अखेर रायगड जिल्हा प्रशासनाने केली अनोखी युक्ती

दरड प्रवण गावांच्या मदतीसाठी यंत्रणा तयार ठेवा, चंद्रकांत पाटील यांचे आदेश

पुणे जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्रातील धोकादायक गावांमध्ये आपत्ती आल्यास त्यावेळी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार ठेवावी, असे आदेश पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती, धरणातील पाण्याची स्थिती, दरड प्रवण आणि पूरप्रवण गावांची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व दरड प्रवण गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची माहिती घ्यावी. पावसाळ्यात कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी. तालुका पातळीवर प्रत्येक आठवड्यात दरड प्रवण गावांना भेटी देण्यात याव्यात. या गावांमध्ये धोक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. नागरिकांना आपत्तीच्या वेळी घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्यात यावी.’

सातपुडा पर्वत रांगांमध्ये ढगफुटी, मुक्ताईनगरमध्ये हाहाकार, मातीचा बंधारा फुटून सहा गावांमध्ये शिरले पाणी

दरडी पडण्याचा धोका असलेल्या भागात पावसाच्यावेळी वाहतुकीसाठी रस्ते बंद ठेवावेत. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणतीही दुर्घटना होणार नाही यादृष्टीने आवश्यक प्रतिबंध घालण्यात यावे. आपत्तीच्या वेळी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक साधने आणि मनुष्यबळाचे नियोजन तयार ठेवावे. विशेषत: दरड प्रवण क्षेत्रात तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार ठेवावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

Neelam Gorhe: बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या कार्य शैलीत फरक काय? नीलम गोऱ्हे मटा कॅफेत म्हणाल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed