बुधवारी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर गुरुवारी यवतमाळमध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. शुक्रवारही पावसाचा जोर खूप जास्त होता. जिल्ह्यात सरासरी१९.८ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ६९.१ मिमी पाऊस उमरखेड तालुक्यात झाला आहे. महागाव ४९.३, आर्णी ५७.४, दिग्रस११.८, पुसद९.६,नेर३.९, वणी २०, मारेगाव १४.५, झरी १०.९, केळापुर १५.२, घांटजी१५.५, राळेगाव ६८, दारव्हा८८, बाभुळगाव ८, कंळब ४.२ तर यवतमाळ तालुक्यात सरासरी३८ मिमी पाऊस झाला आहे.
शुक्रवारी सकाळनंतर पावसाने पुन्हा जोर धरला तो रात्रीपर्यंत जोरदार कोसळला. मध्यरात्रीच्या सुमारास महागाव तालुक्यात काही भागात ढगफुटीसह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून नदी नाल्यांना पूर आले आहे. गेल्या २४ तासांपासून पाण्याची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. पुरामुळे अनेक शेताचे बांध फुटल्याने पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप आले आहे.
जनजीवन विस्कळीत…
आर्णी तालुक्यातील गणगाव ते तरोडा दरम्यानच्या नाल्याला गुरुवारी पुर त्यामुळे गनगावचा संपर्क तुटला होता. लोणबेहळ अंजनखेड परिसरात अनेक शेतामध्ये आणि शहरांमध्ये पाणी साचले आहे. सावळी सदोबा परिसरातील वरुड भक्त परिसरात नाल्याच्या पुरामुळे पीक खरडून गेले. दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील अडाण नदीच्या रपट्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
पुराने अडवले रस्ते, विजेचे खांब वाकले
कंळब, राळेगाव, बाबुळगाव, नेर तालुक्यात पावसाचा जोर कायम पाहायला मिळाला. राळेगाव तालुक्यातील पावसामुळे सराटी ते झाडकिनी मार्गावरील पुलावरून पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली. काल झालेल्या जोरदार पावसाने शहरातील जीवन विस्कळीत झाले आहे .अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून वाघाडी नदीजवळ जवळच्या वस्तीला पुराने वेढा घातला आहे. एका घराची पडझड झाल्याने त्यात एका महिलेचा दबुन मृत्यू झाला.