• Mon. Nov 25th, 2024
    इर्शाळवाडीवर दु:खाची दरड,  मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, अनाथ मुलांचं पालकत्व स्वीकारलं

    मुंबई : इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याने अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत२२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी एवढ्यावरच न थांबता इर्शाळवाडीच्या अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे मुलांच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची जबाबदारी घेण्यात आलीये.

    ‘त्यांना’ मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी….

    ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.

    इर्शाळवाडीच्या पायथ्याशी काय घडलं? नखशिखान्त चिखलाने माखलेले पेशंट, डॉक्टरांनी सांगितली स्टार्ट टू एंड कहाणी
    शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे.

    हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे.

    Irshalwadi Landslide: ३६ तासांनंतर महिलेला ढिगार्‍यातून बाहेर काढलं, भाच्यांना वाटलं मामी जिवंत आहे; पण…
    राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करून कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय

    राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी दुर्घटनेबाबत आज झालेल्या मंत्रिमडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी ज्या ठिकाणी धोका आहे अशा दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *