• Mon. Nov 25th, 2024

    आमदार फोडण्यात व्यस्त नसता तर इर्शाळवाडीची दुर्घटना टळली असती; अमित ठाकरेंचा टोला

    आमदार फोडण्यात व्यस्त नसता तर इर्शाळवाडीची दुर्घटना टळली असती; अमित ठाकरेंचा टोला

    जळगाव: रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. हे आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी खोचक टिप्पणी अमित ठाकरे यांनी केली.

    राजसाहेब ठाकरे यांनी आधीच इर्शालवाडी येथील घटनेबाबत लक्ष वेधले होते . अशी घटना घडू शकते, सरकारने त्याकडे लक्ष द्यावे, हे राजसाहेब ठाकरे यांनी आधीच सरकारला सांगितले होते. सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर कदाचित इर्शाळवाडी सारख्या घटना होण्यापूर्वी सरकारने लक्ष दिले असते. इर्शाळवाडीची घटना ही अत्यंत दुर्दैवी याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली.

    Irshalgad: शरद पवार किल्लारीला अन् एकनाथ शिंदे इर्शाळवाडीला, ३० वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या कामाने आठवणी ताज्या

    मी मनसे विद्यार्थी परिषदेच्या पुनर्बांधणीसाठी आलो जळगावात होतो. पक्षाच्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्याही अडचणी मी समजून घेतो आहे आणि तो अहवाल मला साहेबांना द्यायचा आहे. युनिट स्थापन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे, त्याद्वारे विद्यार्थ्यांशी डायरेक्ट संवाद साधता येणार असून त्यांच्या तक्रारीसाठी एक बॉक्स ठेवण्यात येणार आहे.या माध्यमातून नेमकं स्थानिक पातळीवर कोण कार्यकर्ते काम करते आहे किंवा कोण काम करत नाहीये हे सुद्धा जाणून घेत आहे. जे काम करतील त्यांना बढती देण्यात येऊन नवीन कार्यकारण्या घोषित करण्यात येणार आहे व जे काम करणार नाही, त्यांना डच्चू देण्यात येईल. काम करणाऱ्यांनाच संधी देण्यात येईल, असा इशारा अमित ठाकरे यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला.

    इर्शाळवाडी दुर्घटना कळताच गावी धाव, जाऊन पाहिलं तर सारं सपाट झालेलं, मामा-मामा आवाज देताच…

    राज ठाकरेंची प्रशासनावर आगपाखड

    रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा, असे राज ठाकरे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

    खालापूरजवळील इर्शाळवाडीवर दरड, जीवाभावाचा माणूस गेला नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed