• Sat. Sep 21st, 2024

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाट बंद

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय; कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाट बंद

खेड : कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रघुवीर घाटातील पर्यटनावरती बंदी घालण्यात आली आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. सदर ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची पर्यटनासाठी मोठया प्रमाणात ये-जा सुरु असते. खेड उपविभागातील खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट हा दिनांक २० जुलै २०२३ ते ३१ जुलै २०२३ पर्यटनाकरीता बंद बंद करण्यात येत असल्याचा आदेश खेड उपविभागीय अधिकारी आणि दंडाधिकारी राजश्री मोरे यांनी सायंकाळी उशिरा तातडीने जारी केला आहे. पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

परंतु हा रघुवीर घाट रस्ता व डोंगर भागालगत दरड कोसळण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी दरड कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट व डोंगर भागालगत दरड कोसळून जीवित हानी होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.

देशातील श्रीमंत नेत्यांची यादी जाहीर, काँग्रेस नेते डीके शिवकुमारांकडे सर्वाधिक संपत्ती, सर्वात गरीब आमदार?
रघुवीर घाट हा पर्यटन स्थळ असलेने सदर ठिकाणी लोकांची ये-जा तसेच लोकांचे सदर क्षेत्रास भेट देण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पावसाळ्यामध्ये छोट्या-मोठया दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असलेने सदर मार्ग जाण्या-येण्यासाठी धोकादायक होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये दरड कोसळून मानवी जिवीतास धोका उद्भविण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर; बिलोलीत नाल्याला पूर आल्याने विद्यार्थ्यांसह पालक अडकले
यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती माहिती खेडच्या प्रांताधिकारी राजश्री मोरे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना दिली आहे.

भितीदायक! राज्यात १४७ गावांना भूस्खलनाचा धोका; कोल्हापुरातील हे गाव आहे भितीच्या सावटाखाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed