काय आहे प्रकरण?
या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात कारभारी आसाराम जाधव (वय ५३, रा. नाथनगर, मयूरपार्क, हर्सूल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १२ जुलै रोजी दुपारी १२ ते १२.१५ च्या दरम्यान त्यांना ७०३८०९५६०४ या मोबाइलवरून कॉल आला. कारभारी जाधव यांच्या कॉलवर पीएसआय शिंदे असल्याचे सांगितले. कारभारी जाधव यांचा विश्वास संपादन करून या मोबाइलधारकाने २० हजार ५०० रुपये किमतीच्या इन्व्हर्टरच्या बॅटरी घेऊन गेला. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अशाच प्रकरणांमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पीएसआयच्या नावे फोन आल्यानंतर फसवणूक झाल्याबाबत सिटी चौक पोलिस ठाण्यात एका व्यापारी महिलेने तक्रार दिली आहे. त्यांच्याकडून आरोपीने नऊ हजार ८०० रुपयांची पाण्याची मोटर घेऊन त्याचे पैसे दिले नाहीत. दुसऱ्या घटनेत आरोपीने एक्साइड बॅटरी, इन्व्हर्टरची ४१ हजार ५०० रुपयांची खरेदी करून सचिन काळे या व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. याबाबत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.