• Wed. Nov 13th, 2024

    लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून शरद पवारांची नात झाली पदवीधर, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

    लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून शरद पवारांची नात झाली पदवीधर, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिनं अर्थशास्त्रात मोठं यश संपादन केलं आहे. रेवतीनं लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून अर्थशास्त्रातील पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. निकाल जाहीर झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट देखील केली.

    रेवतीची आई, खासदार सुप्रिया सुळे या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘ आमची कन्या रेवती हिने लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समधून मास्टर्स डिग्री मिळवली आहे. आजच तिचा निकाल आला असून तिचे पालक म्हणून आम्हाला तिचा अभिमान वाटतो. पण तिचा हा ग्रॅज्युएशनचा प्रवास आम्हाला अनुभवता आला नाही याचे दु:ख वाटतेय, पण हेच आयुष्य आहे.’

    एसटी रेल्वेच्या मदतीला, रेल्वे स्थानकापासून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथूनच मिळवली पीएचडी

    लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स ही जगप्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेतून जगभरातील अनेक महान व्यक्तींनी शिक्षण घेतलं आहे. भारतातील थोरांनीही येथे शिक्षण घेतलं आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याच संस्थेमधून अर्थशास्त्रातली आपली पीएचडी केली आहे.

    Naresh Goyal : जेट एअरवेजचे नरेश गोयल यांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून नवा गुन्हा दाखल, आठ ठिकाणी छापे
    तसेच माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन, माजी संरक्षण मंत्री व्ही. के. मेनन, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले ज्योती बसू यांनीही याच संस्थेतून शिक्षण घेतले आहे.

    Kolhapur Rain: जिल्ह्यात ३० बंधारे पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, किल्ल्यावर अडकलेले पर्यटक सुखरूप

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed