• Mon. Nov 25th, 2024

    जिल्हाधिकाऱ्यांची साद,सेवानिवृत्त पोलिसाचा प्रतिसाद,तृतीयपंथीय समाजासाठी पाऊण एकर जमीन दान

    जिल्हाधिकाऱ्यांची साद,सेवानिवृत्त पोलिसाचा प्रतिसाद,तृतीयपंथीय समाजासाठी पाऊण एकर जमीन दान

    धाराशिव : जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी जिल्ह्यातील तृतीयपंथियांना शासनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्याला प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस नाईक लाडाप्पा चिक्काळे यांनी त्यांच्या नावे आळणी शिवारात असलेली ३३ गुंठे म्हणजेच तब्बल पाऊण एकर जमीन तृतीयपंथीयांसाठी दान दिली आहे. ही जागा तृतीयपंथीयांसाठी निवासस्थाने अथवा इतर प्रायोजनासाठी वापरता येणार आहे.

    समाजाने नाकारलेला तृतीयपंथीय समाज आज वंचित आणि बहिष्कृत जीवन जगत आहे. त्यांना शासनाच्या कोणत्याही योजना, सेवांचा लाभ मिळत नाही. परिणामी वर्षानुवर्षे उपेक्षित जीवन त्यांच्या वाट्याला आलेले आहे. तृतीयपंथी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन तृतीयपंथी बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी रेशनकार्ड, बँक खाते उघडणे,६५ वर्षापुढील लाभार्थ्यांना निराधार योजनेचा लाभ देणे, त्यांच्यासाठी शहरालगत स्वतंत्र स्मशानभूमीकरिता जागा उपलब्ध करुन देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित केले. तसेच एकही तृतीयपंथी शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही डॉ.ओम्बासे यांनी दिले होते.

    सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी आनंदाची बातमी, उद्यापासून मिळणार पैसे; जाणून घ्या कसे
    तृतीयपंथी हे समाजाचाच एक घटक असल्याने त्यांच्याकरिता काहीतरी करावे या हेतूने पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस नाईक लाडाप्पा चिक्काळे यांनी आळणी शिवारात त्यांच्या नावे असलेली 33 गुंठे जमीन दान दिली आहे. यावेळी तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे,आळणी ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद वीर, ग्रामसेवक तसेच तृतीयपंथीयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या जागेचा तृतीयपंथीयांकरिता निवासस्थान, वस्ती वा इतर प्रायोजनासाठी वापर करण्यात येणार आहे. तृतीयपंथी बांधवांना हक्काची जागा मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
    माळशेज घाटात इन्होवा व नॅनो कारची समोरासमोर धडक; अपघातानंतर इन्होवा ३० फूट ओढ्यात कोसळली
    काही दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्यानं तृतीयपंथीय समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरत टीका केली होती. त्यानंतर तृतीयपंथीय आक्रमक झाले होते. त्यांनी संबंधित राजकीय नेत्यांकडे कारवाईची मागणी देखील केली होती. तृतीयपंथियांना सन्मान मिळणार की नाही असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर लाडाप्पा चिक्काळे यांनी घेतलेला निर्णय दिलासादायक आहे.
    राज्यात युती मतदारसंघात कुस्ती, शिंदेंच्या शिलेदारानं टेन्शन वाढवलं, फडणवीसांच्या विश्वासू आमदाराला आव्हान

    २०७ किलो सोने अन् ३५४ हिरे, तुळजाभवानी मातेच्या तिजोरीतील दानाचं १५ वर्षानंतर मोजमाप!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed