नुकतीच आषाढी एकादशी पंढरपूर येथे मोठ्या हर्षोल्हासात साजरी केल्यानंतर राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रमुख दिंड्या या परतीच्या मार्गावर आपापल्या गावाकडे परतल्या आहेत.
या पालखी सोहळ्यामध्ये महिला व पुरुष वारकरी पताकाधारी सेवेकरी आपल्या आपल्या परिसरातील दिंड्यांसोबत पांडुरंगाकडे दर्शनाकरता जातात. याचपैकी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मंगरूळ येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थानच्या पालखीसोबत पिंपळगाव सराई येथील ६५ वर्षीय महिलेने तब्बल २४ दिवस प्रवास करून विठू माऊलीचे दर्शन घेतले आणि दर्शन घेऊन परतल्यानंतर एका आगळ्यावेगळ्या सर्वधर्मसमभावाचे जिवंत उदाहरण समोर ठेवले. या निमित्ताने जातीपातीचे गट करून राहणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे एक उदाहरण समोर आले आहे.
बुलढाणा जि्ह्यातील मंगरूळ तालुका, चिखली येथील विठ्ठल रुख्मिणी संस्थानच्या पालखीसोबत तब्बल २४ दिवस प्रवास करून पिंपळगाव सराई येथील एका ६५ वर्षीय महिला वारकरीने विठुमाऊलीचे दर्शन घेतले. पिंपळगाव सराई परिसरातील मुस्लिम बांधवांनी एकोपा दाखवत ज्या
बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील ६५ वर्षीय महिलेने पंढरपूर वारी पूर्ण केली याबद्धल त्यांचा गावातील मुस्लिम बांधवांनी सत्कार करून इतरांसमोर सर्वधर्मसमभावाचा एक आदर्श ठेवला आहे.
श्रद्धा, परिश्रम व निर्धार याची जोड लाभली तर काहीही अशक्य नाही हे गावातील सीता श्रीराम गवते या महिलेने सिद्ध केले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी पंढरपूरची आषाढी वारी यशस्वी केली. मंगरूळ तालुका, चिखली येथील विठ्ठल रुख्मिणी संस्थानच्या पालखी सोबत तब्बल २४ दिवस प्रवास करून त्यांनी विठुमाऊलीचे दर्शन घेतले. यानंतर पिंपळगाव सराई येथे त्या परतल्या. त्यांच्या या भक्तीने प्रभावीत होऊन गावातील मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरी जाऊन साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार केला.
पिंपळगांव ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शेख फारुक शेख ममलू मुजावर यांनी सहकुटुंब या माऊलीचा सत्कार केला. यावेळी मन्नत फाऊंडेशनचे सचिव शेख जावेद शेख फारुक मुजावर, अध्यक्ष शेख साजेद शेख फारुक मुजावर, असलम पठाण, सखाराम आनंदा गवते, अवचितराव गवते, अशोक तरमले, राजेन्द्र देशमुख, सुदाम चंद्रे, शालिकराम गवते, संजय तरमले, सुनील खंडारे, संजय तायडे, विठ्ठल सोनुने, गजानन गवते, अशोक साखरे आदी उपस्थित होते.
आज धर्माच्या नावावर माणसा माणसात तेढ निर्माण केल्या जात आहे. आणि धर्माचे आणि जातीचे राजकारण केल्या जाते .आपापसात मतभेद पसरवून अशांतता निर्माण केल्या जाते .पण आपल्या कृतीतून जी वृत्ती समाजामध्ये भेदभाव निर्माण करते. त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत. ही एक माऊलीची सेवाच म्हणावी लागेल असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही.