१९९५ ला शरद पवारांनी आपल्या मर्जीतल्या नेत्याला तिकीट दिलं त्यावेळी आमदारकीसाठी वेटिंगवर असलेल्या अनिल देशमुखांनी शरद पवारांनाच अंगावर घेतलं.
अनिल देशमुख कारकिर्द
> जुलै १९९२ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड
> त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा सरकारचा निर्णय
> हाच निर्णय पथ्यावर पडला आणि देशमुखांचा दबदबा वाढला
> १९९५ च्या निवडणुका येताच देशमुखांचा निवडणूक लढण्याचा निर्धार
> काटोल मतदारसंघातून इच्छुक असलेल्या देशमुखांची उमेदवारी काँग्रेसने नाकारली
> काटोल मतदारसंघात काँग्रेसकडून पवार समर्थक सुनिल शिंदेंना उमेदवारी
अपक्ष लढूनही अनिल देशमुखांनी काँग्रेस उमेदवाराला घाम फोडला आणि त्यामुळेच काटोलमध्ये पवारांनी सभा घेतली. पण देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून सभा उधळवली. सभेत बोलता न आल्याने पवारांना सभेतून काढता पाय घ्यावा लागला. इथेच अनिल देशमुखांचा विजय निश्चित मानला गेला.
> १९९५ ला काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत अनिल देशमुख आमदार
> युती सरकारला पाठिंबा देत शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री पद मिळवलं
> मात्र, राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी देशमुखांची पवारांना साथ
> पुढे आघाडी सरकारमध्ये १५ वर्ष मंत्रीपदी कायम
> २०१९ सरकार येताच गृहमंत्री पदावर वर्णी
मविआ काळात अनिल देशमुखांवर वसुलीचे गंभीर आरोप झाले. तेव्हा शरद पवार देशमुखांच्या पाठिशी ठाम उभारले. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत पवारांनी देशमुखांचा राजीनामा घेतला नव्हता.. मात्र, जेलमधून आल्यानंतर अनिल देशमुखांनी पुन्हा जोमाने राजकारणात पुनरागमन केलं. आता राष्ट्रवादीतून फूट पडली असताना अनिल देशमुख पवारांच्या साथीला राहिलेत. सगळा पक्ष रिकामा झाला असताना अनिल देशमुख नावाचा निष्ठावंत पवारांमागे बुरुजासारखा उभारलाय.