• Sun. Sep 22nd, 2024
सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला, चार तरुणांचा दुर्दैवी अंत, तोल जाऊन थेट तलावात कोसळले

चंद्रपूर : जिल्हातील प्रसिद्ध घोडाझरी तलाव येथे पर्यटनासाठी संपूर्ण विदर्भातून पर्यटक येत असतात. आज आलेल्या आठ पर्यटक तरुणांना सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला आहे. सेल्फी काढताना एक तरुण तलावात पडला. लागोपाठ तीन तरुणही तलावात पडले. इत्तर चार तरुणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयशी ठरले. मनीष श्रीरामे ( वय २६ वर्षे), धीरज झाडे ( वय २७ वर्षे), संकेत मोडक ( वय २५ वर्षे), चेतन मांदाडे (वय १७ वर्षे) अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात प्रसिद्ध घोडाझरी तलाव आहे. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक इथे भेट देत असतात. आज वरोरा तालुक्यातील आठ युवक चारचाकी वाहनाने तलावाकडे आले होते. यातील काही युवक घोडाझरी तलावात मौज मस्ती करताना कॅनल परिसरात गेले. तिथे त्यांना सेल्फी काढण्याचा मोह झाला.

धक्कादायक! खेळायला जातो असे आईला सांगून महंमद घराबाहेर पडला तो परतलाच नाही, जे घडले ते दुर्दैवी
सेल्फी घेत असतांना एक तरुण घसरून पडला. त्याच्यानंतर तीन युवक लागोपाठ घसरून पडले. उर्वरित इतर चौघांनी त्यांना वाचवण्याच्या प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. मृतात मनीष श्रीरामे, धीरज झाडे, संकेत मोडक, चेतन मांदाडे या चौघांचा समावेश आहे.

नागपूर हादरले! १० वर्षीय मुलीवर ६५ वर्षीय वृध्द व्यक्तीचा अत्याचार, परिसरात उसळला संताप
या घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर आप्पती व्यवस्थापन विभागाची टीम घटनास्थळी रवाना झाली. त्यांनी लगेच शोध कार्य सुरु केले आहे. घटनास्थळी नागभीड पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित आहेत. ही बातमी लिहीपर्यंत मृतदेह सापडले नव्हते.

गरोदर मातेला अचानक शेतातच प्रसूतीकळा सुरू, आरोग्य सेविकेच्या तत्परतेने टळला धोका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed