• Sat. Sep 21st, 2024

बारावीच्या विद्यार्थिनीचं भरारी घेण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं, सततच्या छेडछाडीमुळे घडलं भयंकर

बारावीच्या विद्यार्थिनीचं भरारी घेण्याचं स्वप्न अधुरचं राहिलं, सततच्या छेडछाडीमुळे घडलं भयंकर

नांदेड : जिल्ह्यात धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून एका बारावीतील विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मुदखेड तालुक्यातील मौ. डोंगरगाव येथे बुधवारी ही घडली आहे. सपना सतीश पेदे (वय १७ रा. निवघा) असे मृत तरुणीचे नाव आहे.
क्लास-बिसची भानगड नाय, बसल्या बैठकीला ८ तास अभ्यास, मजुराची लेक PSI झाली
सपना ही रोज सायकलवरून बारड इथल्या महाविद्यालयात जात होती. महाविद्यालयात जात असताना सपनाच्या गावातील ज्ञानेश्वर पवार (वय २२) हा कायम तिची छेड काढत होता. वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. सपनाने ही गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगितली. त्यानंतर सपनाच्या आई-वडिलांनी याबाबत आरोपीच्या घरी आणि पोलीस पाटलांना माहिती दिली होती. यानंतरही छेडछाडीचा प्रकार सुरूच होता. यामुळे सपनाला कॉलेजला जाणंही अवघड झालं होतं. या छेडछाडीला सपना कंटाळली होती. अखेर सपनाने बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास डोंगरगाव शिवारातील गणेश आनंदराव व्यवहारे यांच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. शेतकरी नवरा हवा गं बाई, बँक मॅनेजर लेकीची इच्छा; युवा शेतकऱ्याला जीवनसाथी म्हणून निवडलं
दरम्यान, या प्रकरणी सपनाची आई सारीका सतीश पेदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेवून त्याला अटक केली आहे. छेडछाडीला कंटाळून मुलीला आत्महत्या करण्याची वेळ आल्याने मुदखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शेतकरी नवराच हवा गं बाई; उच्च शिक्षित लेकीचा हट्ट बापानं पूर्ण केला, अन् अखेर हवा तसा जावई शोधला

मुलींच्या शिक्षणासाठी अनेक जण झाले स्थलांतरित

दरम्यान, यापूर्वी या भागात विद्यार्थिनीच्या छेडछाड प्रकरणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. सुसंस्कृत कुटुंब या छेडछाडीला कंटाळून गाव सोडून शहरात आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी स्थलांतरित झाले आहेत. पण गोर गरीब घरातील मुली मात्र आजही गावगुंड, रोडरोमिओचे बळी ठरत आहेत. मुलींची छेडछाड, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed