• Mon. Mar 9th, 2026
    खासगी ट्रॅव्हल्स अन् ट्रकची जोरदार धडक, समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; २० प्रवासी जखमी

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल सावंगी येथील समृद्धी महामार्गावर गेट क्रमांक १६ जवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्सच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला असून यामध्ये २० जण जखमी झाले आहेत. यापैकी ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ९ जणांवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की परिसरामध्ये मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

    गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. एका पाठोपाठ एक भीषण अपघात या समृद्धी महामार्गावर होत आहेत. काही दिवसांपूर्वी बुलढाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये तब्बल २५ निष्पाप जणांचा जीव गेला होता. ही घटना ताजी असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल सावंगी परिसरामध्ये असलेल्या समृद्धी महामार्गावर काल मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला.
    खुराणा या खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला आहे.

    Nashik Bus Accident : सप्तश्रृंगीगड घाटात भीषण अपघात, ३५ प्रवाशांसह बस थेट दरीत कोसळली
    दरम्यान, या भीषण अपघातानंतर परिसरामध्ये मोठ्याने आवाज झाला. आवाज ऐकताच नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीय. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग, संध्याकाळचा मुहूर्त? आमदार निरोपाच्या प्रतीक्षेत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed