• Sat. Sep 21st, 2024
शेतकरी कुटुंबातील मयूर बनला पीएसआय; ना क्लास, ना सोयीसुविधा, स्वयंअध्ययनाने मिळवले मोठे यश

सातारा : वाई तालुक्यातील ओझर्डे गावामधील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मयूर प्रमोद गवते याने स्वयंअध्ययन करून एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. या यशामुळे पोलीस उपनिरीक्षक झालेल्या मयूरचे यश युवकांना प्रेरणादायी ठरणार आहे.

मयूरने एमपीएससीचा अभ्यास करत असताना कोणत्याही महागड्या सुविधा, क्लास अथवा अकॅडमीच्या मागे न लागता स्वयंअध्ययन करण्याचा निश्चय केला. त्यानंतर त्याने अत्यंत खडतर अभ्यास करून ही परीक्षा पास केली आहे. त्याच्या यशाबद्दल गावातील ज्येष्ठ नागरिकांना कुतूहल वाटत आहे. आजकालची मुले ही मोबाईलवेडी झाली आहेत, व्यसनाधीन झाली आहेत. मात्र, मयूरने याला बगल देऊन आपल्याला कोणीतरी बनायचं आहे हे मनात ध्येय बाळगून ते पूर्ण केलं आहे.

Big success of Mayur

मयूरचे मोठे यश

आई-वडिलांची मोठी साथ मिळाली

यासाठी मयूरला त्याचे आई-वडिलांची मोठी साथ मिळाली. मयूरच्या घरची परिस्थिती ही चांगली असल्याने त्याला अधिक पाठबळ मिळत गेले. यामुळेच तो हे यश संपादन करू शकला. या यशाचे सारे श्रेय त्यांनी आपल्या आई- वडिलांना दिले आहे.

मयूर गवते याने २०१९ पासून एमपीएससीचा अभ्यास करत असताना पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक अशा दोन परीक्षा दिल्या होत्या. या दोन्ही परीक्षा तो दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे. या दोन्ही परीक्षा पास होण्याचा मान गावामध्ये पटकावला आहे. त्याचे हे यश ओझर्डे गाव व तालुक्यातील युवकांना प्रेरणादायी आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्रपरिवाराकडून मयूरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Mayur Gavte

मयूरचे मोठे यश

मयूरचे प्राथमिक शिक्षण त्याच्या ओझर्डे गावातील जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शिक्षण पतीत पावन विद्यामंदिरमध्ये झाले आहे, तसेच इयत्ता बारावीचे शिक्षण राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे झाले आहे, तर बीएससी एग्रीकल्चर ही पदवी कृषी महाविद्यालय, पुणे येथून पूर्ण केली आहे.

‘कोणत्याही गोष्टीत सातत्य राखणे महत्वाचे असते. ते मी करू शकलो. वेगळे काही तरी करतोय याचा आनंद मला आहे. त्याचप्रमाणे सोबत, फ्रेंड सर्कल चांगले पाहिजे. तसे मित्र मला मिळत गेले, त्यामुळे हे यश मी लवकर मिळवू शकलो’, असे मयूर गवतेने महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed