पिंपरी, पुणे : पुण्या प्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोयता गँगची दहशत पिंपरी चिंचवड शहरात वाढू लागली आहे. पिंपरी येथील चिखली परिसरात एका व्यावसायिकाला मारहाण करत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींना अटक केली आहे. एवढेच नाही तर जिथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणाहून पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील रुपी नगर भागात हा प्रकार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींची धिंड काढून त्यांना उठाबशाही काढायला लावल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील रुपी नगर भागात ८ जुलैला कोयता गँगने सात ते आठ वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. तसेच एका व्यावसायिकाला मारहाणही केली होती. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये टिपली गेली होती. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

गाव गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. गुंडांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. दहशत माजवणाऱ्या कुणाचीही हायगय केली जाणार नाही. त्यामुळे दहशत निर्माण करणाऱ्यांना पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे. पोलिसांकडून धडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व सामन्यांच्या मनात गुंडांची दहशत कमी व्हावी, या उद्देशाने पोलिसांकडून पावले उचलण्यात येत आहेत.