• Mon. Nov 25th, 2024
    मेयो हॉस्पिटलच्या वॉर्डला आग; फायर अलार्म न वाजल्याने रुग्णांमध्ये गोंधळ, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

    नागपूर: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल (मेयो) ऑर्थोपेडिक विभाग वार्ड क्र. ३४ मध्ये मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. वॉर्डात २५ रुग्ण होते. संपुर्ण वॉर्ड धुराने भरला होता. सुदैवाने कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
    मेंढपाळाच्या डोळ्यासमोरच वाहनाने १०० हून अधिक शेळ्यांना चिरडले; अंगावर काटा आणणारे दृश्य
    मेयो रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ऑर्थोपेडिक विभागाच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये डॉक्टरांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक या खोलीतून धूर बाहेर पडू लागली. या खोलीतील धुराचे लोट वॉर्डात शिरताच नातेवाईकांची धावपळ सुरू झाली. वॉर्डात उपस्थित डॉक्टर आणि परिचारिकांनी तातडीने सुरक्षा रक्षकाला याची माहिती दिली. खोलीत ठेवलेल्या गाद्या आणि तारा जळत होत्या. त्याचवेळी कर्मचाऱ्यांनी वॉर्डचा वीजपुरवठा बंद केली. तत्काळ मेयो रुग्णालयाच्या विद्युत सुरक्षा अधिकाऱ्यासह महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी वॉर्डात धाव घेत अग्निशमन सिलेंडरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. वॉर्डात धुराचे लोट पसरल्याने रुग्णांची सेवा काही काळ खोळंबली होती.

    पुण्यात अग्नीतांडव; मार्केटयार्डमधील हॉटेलमध्ये आग, पोटमाळ्यावर झोपलेल्या २ कामगारांचा

    वॉर्डात २५ रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र कोणत्याही रुग्णाला कोणतीही अडचण आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. याआधीही बालरोग विभागातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली होती. त्यावेळी कार्यरत असलेल्या परिचारिकांच्या मेहनतीमुळे १० नवजात बालके वाचली. मेयो रुग्णालयात अग्निशमन उपकरणे बसवण्यात आली आहेत. मात्र त्यांची नियमित देखभाल केली जात नाही. आज आग लागली तेव्हा वॉर्डातील फायर अलार्म वाजला नाही. मात्र, खोलीतील धूर पाहून तेथे उपस्थित लोकांनी आरडाओरडा केल्यावर आग लागल्याचे कळले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *