• Thu. Nov 28th, 2024

    हेडलाईटमध्ये साप, पूर्ण गाडी उघडली तरी तो बाहेर येईना, मग… अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

    हेडलाईटमध्ये साप, पूर्ण गाडी उघडली तरी तो बाहेर येईना, मग… अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

    नागपूर: वाहनाने प्रवास करत असतानाही रस्त्यावर साप दिसला की भीती वाटते, मात्र एका महिलेच्या मोपेडच्या हेडलाईटमधून साप बाहेर आल्याची थरारक घटना नागपुरात घडली आहे. वाठोडा परिसरातील इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी बाहेर काढत असताना हेडलाइटच्या गॅपमधून साप बाहेर आला. महिलेने तात्काळ गाडी थांबवली आणि सर्पमित्राच्या मदतीने सापाला बाहेर काढण्यात आले. साप काढतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    अखेर एलियन्सच्या घराचा पत्ता सापडला, ‘या’ ग्रहावर आहे वास्तव्य, शास्त्रज्ञांच्या हाती मोठी माहिती
    मिळालेल्या माहितीनुसार, सीमा धुळसे नावाच्या महिलेला मंगळवारी दुपारी १२ च्या दरम्यान वाठोडा येथील प्रधानमंत्री आवास योजना इमारतीत बँक योजनेच्या वसुलीच्या कामासाठी आले होते. मोपेड क्रमांक MH-४९, R-२४५९ वर कलेक्शनसाठी आल्या होत्या. त्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून कलेक्शन साठी गेल्या. कलेक्शनचे काम करून परतल्यावर त्यांनी गाडी सुरू केली आणि गाडी पार्किंग मधुन बाहेर काढत असताना त्यांच्या गाडीचा हेडलाईटच्या गॅपमध्ये त्यांना सापाची शेपूट दिसली. त्यांनी तात्काळ गाडी थांबवून लगेच याची महिती सर्पमित्र आणि वाइल्डलाइफ वेलफ़ेयर सोसायटीचे सदस्य लकी खारोडे, सतीश जांगडे, धीरज मेश्राम यांना फोन करुन याची माहिती दिली.
    ते घटनास्थळी पोहोचले, साप गाडीत लपल्याने त्याला शोधायला वेळ लागत होता गाडी पूर्ण उघडून सापाला बाहेर काढण्यात आले. सापाला बाहेर काढल्यानंतर पर्यावरणात सोडण्यात आले. सापाला बाहेर काढतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गाडी बाहेर काढताना साप लगेच दिसला म्हणुन बरं झालं. चालत्या गाडीत हेडलाईटवर साप आल्यास भीतीपोटी अपघात होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.

    आईचा एक गुरुमंत्र अन् मुलगा क्षणात कोट्यधीश झाला, कहाणी वाचून थक्क व्हाल…
    मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा परिणाम माणसांवरच नाही तर प्राण्यांवरही होतोय. साप भूगर्भातील उंदरांचे बिळे, वाळू, खडक अशा ठिकाणी राहतात. मुसळधार पावसामुळे पाणी जमिनीत पाणी मुरते. त्यावेळी जमिनीखाली राहणारे प्राणी कोरड्या जागेच्या शोधात बाहेर पडतात. वाहनांच्या पेट्रोल टाक्या आणि बोनेट गरम झाले असतात. वाहनांच्या अशा भागांमध्ये साप प्रवेश करतात. वाहन सुरू केल्यानंतर अनेकवेळा भीतीने साप बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघातही घडले आहेत.

    मोटारसायकल चालवत असताना अचानक नागानं काढला फणा, चालकाची उडाली घाबरगुंडी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed