• Mon. Nov 25th, 2024
    गळ्यावर वार, हनुवटी फोडली; मठात गांजा ओढण्यास नकार, नशेत साधूवर जीवघेणा हल्ला

    सोलापूर : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मंदिरवजा मठात गांजा ओढण्यास साधूंनी आणि महंतांनी गर्दुल्यांना विरोध केला. याचा राग मनात धरून गर्दुल्यांनी साधूंवर शसस्त्र हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. समाजकंटकांच्या टोळक्याने महंतावर सशस्त्र हल्ला केल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. सोमवारी दुपारी हा प्रकार घडल्यानंतर जखमी महंतास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    राम कृपाळू दास महाराज (वय ५३) असं जखमी महंताचे नाव आहे. सोलापूर एसटी स्थानकापासून जवळच असलेल्या मुरारजी पेठेत निराळे वस्ती रस्त्यावर राज राजेश्वरी हनुमान मंदिर आहे. या मंदिरात साधूंचा मठ असून तेथे देशाच्या विविध भागातून आलेले साधू, महंत वास्तव्य करतात. या मठात गोंधळ झाल्याने साधू संतानी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

    Rohit Pawar: विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवारांविरोधात कोण उतरणार, रोहित पवार स्पष्टच म्हणाले….
    शहरातील राज राजेश्वरी मंदिरात आणि मठात भाविकांची मोठी वर्दळ असते. परंतु आजूबाजूला असलेले समाजकंटकांचे टोळके किंवा गर्दुले हे गांजा ओढण्यासाठी मठात नेहमी घुसखोरी करतात. साधू, महंत आणि भाविकांचा विरोध झुगारून गांजा ओढण्याचा समाजकंटकांचा कार्यक्रम सुरूच असतो. गर्दुल्यांना गांजा ओढण्यास विरोध करून मंदिरातून हाकलण्याचा प्रयत्न केला जातो.

    गांजा ओढून नशेत असलेले गर्दुले हे साधू संतांच्या अंगावर धावून येत असतात. मात्र, काल सोमवारी दुपारी समाजकंटक असलेल्या गर्दुल्यांनी क्रूरतेचा कळस गाठला. गांजा ओढण्यास विरोध करणारे महंत राम कृपाळू दास महाराजांवर सशस्त्र हल्ला केला. हल्ल्यात महंत रामकृपाळ दास यांच्या गळ्यावर आणि हनुवटीवर गंभीर जखम झाली आहे. त्यांच्यावर हल्ला होताना इतर साधूंनी तात्काळ धावून येत हल्लेखोर समाजकंटकांच्या तावडीतून महंतांची सुटका केली.

    निराळे वस्ती परिसरात राज राजेश्वरी मंदिराशेजारी होत असलेल्या त्रासाबाबत अनेकदा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मठात येऊन समाजकंटक गांजा ओढतात, साधू संतांना आणि महंतांना त्रास देतात, अशी तक्रार करण्यात आली होती. सोलापूर शहर पोलिसांनी याची वेळीच दखल घेतली असती तर आज ही वेळ आली नसती, अशी खंत मठातील साधूंनी शासकीय रुग्णालयात व्यक्त केली. समाजकंटकांवर कारवाई झाली नाही तर,मोर्चे काढू, धरणे आंदोलने करू, असा इशारा साधू संतांनी दिला आहे.
    Tomato Prices: टोमॅटोच्या किमतींनी केला कहर, दर शंभरी पार; ६० रुपये किलो असलेला टोमॅटो महागला कसा?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed