• Mon. Nov 25th, 2024

    उद्धवजी ​कलंकीचा काविळ झाला असेल तर उपचार करून घ्या, फडणवीसांचा पलटवार

    उद्धवजी ​कलंकीचा काविळ झाला असेल तर उपचार करून घ्या, फडणवीसांचा पलटवार

    नागपूर : विदर्भ दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. नागपूर घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपूरला लागलेला कलंक आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कलंकीचा काविळ’ अशा शिर्षकाखाली फडणवीस यांनी भलं मोठं ट्विट करत उत्तर दिलं आहे. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नागपुरात लावलेले पोस्टरही फाडले आहे.
    Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, शिवसेनेच्या ४ मंत्र्यांना डच्चू? एकनाथ शिंदेंसमोर पेच
    उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत काय म्हटले देवेंद्र फडणवीस?

    ‘कलंकीचा काविळ’ !

    १. ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!

    २. आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!

    ३. सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!

    ४. सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!

    माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये येऊ नका, वाद घालणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दरडावलं

    ५. ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!

    ६. पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
    पवार साहेब बैठकीत वेगळं आणि बाहेर वेगळं बोलायचे, छगन भुजबळांनी सगळं सांगितलं!
    ७. कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!

    ८. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!

    असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed