Nagpur Fake Gold Loan Fraud Case: बँकेत बनावट तारण ठेवून तब्बल २३ कोटी रुपयांचे गोल्ड लोन घेतले प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ८ जणांना ताब्यात घेतले आहे.
१८ ऑक्टोबर २०२५ रोजी गोल्ड लोनच्या नियमित ऑडिटदरम्यान एका खात्यातील तारण सोन्याबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर मनिषनगर, मेडिकल चौक, नरसाळा, काटोल रोड, अजनी चौक, छत्रपती चौक, वर्धा रोड, प्रतापनगर आणि नंदनवन शाखांमधील खात्यांची तपासणी करण्यात आली.
Chandrashekhar Bawankule: आदिवासींवरुन काँग्रेसचे राजकारण, राहुल गांधींना राज्यात ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न; बावनकुळेंचा आरोपतपासात बनावट ग्राहकांच्या नावाने कर्ज मंजूर करणे, सोन्याचे वजन व शुद्धतेबाबत चुकीचे मूल्यांकन करणे आणि कर्जाची रक्कम वळविणे, असे प्रकार आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. बँक व्यवहार, केवायसी कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल संपर्क आणि ऑडिट अहवालांची पडताळणी करण्यात आली. आरोपींच्या घरझडतीत मोबाइल, लॅपटॉप, बनावट कर्जदारांच्या याद्या आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली.
मुख्य आरोपी सचिन राऊतने बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने बनावट ग्राहक उभे करून कर्ज मिळविल्याचे तपासात पुढे आले आहे. मूल्यांकनकर्त्याने १५५ बनावट दागिन्यांचे मूल्यांकन केल्याचेही निष्पन्न झाले. संबंधित अधिकारी आणि ऑडिटरच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. आर्थिक गुन्हेशाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
Nagpur Crime : बारमध्ये मित्रांसोबत दारु प्यायला बसलेला, पत्नीचा फोन येताच बाहेर आला अन् तिथेच घात झाला; कुख्यात गुंडाला प्लॅन करुन संपवलंपडताळणीवरच प्रश्न
गोल्ड लोन देताना दागिन्यांची शुद्धता, वजन, मालकी आणि ग्राहकाची ओळख यांची बहुपातळी पडताळणी अपेक्षित असते. मात्र, अशा गैरव्यवहारांत मूल्यांकनकर्ते, शाखास्तरावरील अधिकारी आणि अंतर्गत नियंत्रण यंत्रणेची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे बँकांच्या गोल्ड लोन प्रक्रियेत अधिक कडक डिजिटल नोंदी, स्वतंत्र पुनर्मूल्यांकन आणि नियमित आकस्मिक तपासणीची गरज अधोरेखित झाली आहे.
