• Sat. Sep 21st, 2024

अखेर ठरलं! शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ‘या’ कार्यालयातून चालणार अजित पवार गटाचे कामकाज

अखेर ठरलं! शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ‘या’ कार्यालयातून चालणार अजित पवार गटाचे कामकाज

नागपूर: अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आहे. याचे परिणाम नागपुरातही दिसून येत आहे. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रदेश अधिकारी शेखर सावरबांधे, प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शहर कार्यालयात आयोजित बैठकीत तसा ठराव घेण्यात आला आहे. तर प्रशांत पवार, बाबा गुजर हे नेते अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. शहर कार्यालयावर शरद पवार गटाला ताबा मिळाला आहे. त्यामुळेच आता प्रशांत पवार यांच्या बजाजनगर कार्यालयातून अजित पवार गटाचा कारभार चालवला जाणार आहे.
उद्धव ठाकरेजी, तो प्रस्ताव नेमका असतो तरी कसा? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल अन् चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी गुरुवारी बाबा गुजर यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी तर प्रशांत पवार यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. तीन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी गुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. बाबा गुजर, प्रशांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सतीश शिंदे, नरेश अरसाडे, राजा आकरे, भागेश्वर फेंडर, रमेश फुले, पुंडलिक राऊत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उर्वरित नियुक्त्याही लवकरच जाहीर केल्या जातील. हे पाहता नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाबा गुजर, प्रशांत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सतीश शिंदे, नरेश अरसाडे, राजा आकरे, भागेश्वर फेंडर, रमेश फुले, पुंडलिक राऊत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवारांच्या बंडाने बारामती लोकसभेचे समीकरण बदलले; सुप्रिया सुळेंसमोर खासदारकी वाचवण्याचे आव्हान
राष्ट्रवादीचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उर्वरित नियुक्त्याही लवकरच जाहीर केल्या जातील. हे पाहता नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे भगदाड पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातून निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये बाबा गुजर यांचा समावेश होता. पवार हे प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक आणि ईश्वर बाळबुधे हे छगन भुजबळांचे समर्थक असल्याने ते जातील अशी सर्वांनाच अपेक्षा होती. सतीश शिंदे आणि नरेश अरसाडे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातून आहेत.

पंकजा मुंडे राजकारणापासून दोन महिने अलिप्त राहणार, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

देशमुख आणि शिंदे कुटुंबात सुरूवातीपासूनच राजकीय वैर आहे. सतीश शिंदे यांनी यापूर्वीही देशमुख यांच्या विरोधात शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अरसाडे हे पूर्वी देशमुख समर्थक होते. देशमुख राजकीय समस्या निर्माण करत असल्याने दोघांनी अजित पवारांसोबत घेण्याचा निर्णय घेतला. बजाजनगर काचीपुरा येथील प्रशांत पवार यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयासमोरील फलकाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. नुकतेच अजित पवार यांनी महिनाभरापूर्वी या कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. सुमारे तासभर ते या कार्यालयात थांबले होते. गणेशपेठ येथील कार्यालय सध्या शरद पवार गटाच्या ताब्यात आहे. त्यामुळेच अजित पवार पक्षाची सूत्रे सुरुवातीला बजाजनगरमधून हलतील असे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed