• Sat. Sep 21st, 2024

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: शहरातील काही भागांतील पाणी पुरवठा येत्या गुरुवारी बंद

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: शहरातील काही भागांतील पाणी पुरवठा येत्या गुरुवारी बंद

पुणे : वडगाव जलकेंद्र आणि राजीव गांधी पंपिंग येथील देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी येत्या येत्या गुरुवारी (१३ जुलै) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी (१४ जुलै) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणाऱ्या परिसराला सोमवार (१० जुलै) ते बुधवार (१२ जुलै); तसेच शुक्रवार (१४ जुलै) ते रविवार (१६जुलै) या कालावधीत पाणीपुरवठा करण्यात येणार असून, त्या वेळी पाणीकपात नसेल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

ईडीमुळे बंड? पवारांची साथ सोडली? कोल्हापुरात येताच मुश्रीफांनी दिली सगळ्याच प्रश्नांची उत्तरं

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :

वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २मधील काही भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर.

राजीव गांधी पंपिंग स्टेशन : सच्चाई माता टाकी, संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, वंडरसिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजीनगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागरनगर मधील भाग क्रमांक एक, दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, वरखडेनगर, जुना प्रभाग क्रमांक ४१, येवलेवाडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed