• Sat. Sep 21st, 2024
ठाकरे गटाला मोठा धक्का, नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपू्र्वी आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता नीलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

डॉ. गोऱ्हेंचा शिंदे गटात प्रवेश पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं आहे. ठाकरे गटातील प्रमुख नेत्या म्हणूनही नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाहिलं जात होतं. भाजपसोबतची युती तुटल्यानंतर ठाकरेंची बाजू त्यांनी समर्थपणे सांभाळली होती. त्यांचा ठाकरे गटाला रामराम म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा धक्का आहे.

ठाकरे गटाला रामराम ठोकून नीलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विधानभवनात शिवसेना पक्षकार्यालयात नीलम गोऱ्हेंनी पक्षप्रवेश केला आहे. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उदय सामंत उपस्थित होते.

मुंडे भावंडांची दिलजमाई, पंकजांकडून धनूभाऊंचं औक्षण, मायेनं जवळ घेतलं, व्हिडिओ समोर
शिंदे गटाच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावेळी काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गावर महिला विकास, महाराष्ट्र आणि देश विकासाच्या प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पक्षप्रवेशावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

BMC Election: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं भाष्य, आयुक्त म्हणाले…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना पक्षात १९९८ मध्ये प्रवेश केला. शिवसेनेत मला चांगलं काम करता आलं. सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे, की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेचं समर्थन करते, असं नीलम गोऱ्हे पक्षप्रवेशावेळी म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed