म.टा. प्रतिनिधी, नागपूर: लिफ्ट देऊन विद्यार्थिनी आणि महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बेलतरोडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पांडुरंग किसनराव दांडेकर असे अटकेतील नागरिकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग हा पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो पांढऱ्या रंगाच्या मोपेडने बेलतरोडी परिसरात फिरायचा. पायी जाणाऱ्या महिला आणि मुलींना लिफ्ट देऊन मोपेडवर त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही तो द्यायचा, अशी माहिती आहे. तीन दिवसांपूर्वी त्याने एका १६ वर्षीय विद्यार्थिनीशीही अशाचप्रकारे अश्लील चाळे केले होते. विद्यार्थिनीने घडलेला सारा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने बेलतरोडी पोलिसांत तक्रार दिली.
पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली बेलतरोडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैजयंती मंडवधरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण बेलतरोडीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाचा मोपेडचा क्रमांक मिळाला. त्याआधारे पत्ता शोधून पोलिसांन पांडुरंगला अटक केली. त्याने चार ते पाच महिला आणि विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याची माहिती समोर आली आहे.

पण, बदनामीच्या भीतीने त्यांनी तक्रार केलेली नाही. ‘अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट अथवा खाद्यपदार्थ घेऊ नका, संशय आल्यास त्याच्या वाहनाचा क्रमांक नोंदवून ११२ या क्रमांकावर पोलिसांना माहिती द्या’, असे आवाहन बेलतरोडी पोलिसांकडून करण्यात आले आहे.