• Sat. Sep 21st, 2024
ठाकरे गटाला मोठा धक्का, विधानपरिषदेवरील ज्येष्ठ आमदार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या दुसऱ्या राजकीय भूकंपाचा सर्वात मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या राजकीय हादऱ्याचे दणके अजूनही ठाकरे गटाला जाणवत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असलेला आणखी एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे हा आमदार विधानसभेवरील नसून विधानपरिषदेवरील आहे.

विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे यांच्यानंतर आणखी एक वरिष्ठ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेला संबंधित आमदार उद्धव ठाकरे यांचा अत्यंत निकटवर्तीय मानला जातो. गेली अनेक वर्ष तो शिवसेनेत कार्यरत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार; निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू
विधानपरिषदेतील ठाकरे गटाचं संख्याबळ कमी होत असल्यामुळे या प्रवेशानंतर ठाकरे गटाकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपदही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेतेपदाची धुरा सांभाळणाऱ्या अंबादास दानवे यांच्यावर टांगती तलवार आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करू शकते.

शरद पवारांचे आणखी तीन मोहरे अजितदादांच्या गळाला? देवगिरी बंगल्यावर रात्री गुप्त राजकीय खलबतं
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातील विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. मनिषा कायंदेंनी शिंदेंच्या गटात जाताना उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. मनिषा कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांचा राज्याचे लाडके आणि अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. आमदार संजय शिरसाट, शितल म्हात्रे, रवींद्र फाटक आणि शिवसैनिक यांच्यासह संभाजीनगरमधून उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले होते.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? पंकजा मुंडे-सोनिया गांधींच्या गुप्त भेटीची चर्चा, पंकजा काँग्रेसमध्ये जाणार?
महाविकास आघाडी झाली हा निर्णय जुन्या शिवसैनिकांना आवडला नव्हता. सरकारचं काम व्यवस्थित झालं नाही. पक्षप्रमुखांशी बोलू शकत नाही, मनोगत व्यक्त करु शकत नाही. कुणी कार्यकर्त्यांकडून पैसे उकळतं, महिला शिवसैनिकांकडून पैसे उकळत असेल तर योग्य नव्हतं, असा आरोपही मनिषा कायंदे यांनी पक्षांतरावेळी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed