• Sat. Sep 21st, 2024
जुन्या वादाचा राग, मागून येऊन जीवलग मित्राची पाठीत वार करुन हत्या; नंतर जे केलं त्याने सर्वच चक्रावले

नागपूर : नागपूर यशोधरानगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पिवळी नदी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाने आपल्याच मित्राची निर्घृण हत्या केली. मात्र, ही घटना घडल्यानंतर आरोपीने गिट्टीखदान जाऊन गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला आत्मसमर्पण देखील केलं. भरत गुलाब उईके असं मृताचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी विरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भरत गुलाब उईके असे मृताचे नाव असून, तो धोबीघाट पिवळी नदी परिसरात राहून स्टाईल फिटिंगचे काम करायचा. तर आरोपी रुपेश उर्फ बंटी गडकरी हा मांडवा वस्तीमध्ये राहतो आणि हमाल म्हणून काम करतो. दोघेही एकमेकांना ओळखतात. हे दोघे अनेकदा पिवळी नदी परिसराच्या भोजनालयात जेवायला यायचे आणि भोजनालयाबाहेर बसून गप्पा मारायचे.

Sharad Pawar : अजित पवारांचा पक्षावर दावा, शरद पवारांनी दिल्लीत जाऊन चक्रं फिरवली; कार्यकारिणीत मोठे निर्णय
१५ दिवसांपूर्वी खाण्यापिण्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. या भांडणात भरतने रुपेशला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती. याचा राग रूपेशच्या मनात होता आणि तो बदला घेण्याच्या मनस्थितीत होता. काल रात्री साडेदहाच्या सुमारास भरत हा त्याच्या दोन मित्रांसोबत भोजनालयच्या बाहेर बसून बोलत होता.

त्याचवेळी आरोपी रूपेश तिथे दुचाकीवर येऊन भरतला पाठीमागून चाकूने अनेक वार करून जखमी केले आणि तेथून पळ काढला. भरताच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून आरोपीचा शोध सुरू केला. त्यानंतर मित्राच्या मदतीने रुपेशने गिट्टीखदान गुन्हे कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण केले. या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

शिंदेंसोबतचे आमदार दोन्ही बाजूने फसले; अजित पवार सत्तेत, बच्चू कडू भाजपवर संतापले; म्हणाले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed