• Tue. Sep 24th, 2024
करोनातून वाचलो मात्र शाळेने मारले! मुलीचे शैक्षणिक नुकसान झाल्याने पित्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

धुळे: शिरपूर तालुक्यातील दहीवद येथील एसआरबी इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाकडून अन्याय होत असल्याने पीडित विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे एका पालकाने आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्याकडील पेट्रोलचा कॅन, चाकू आणि विषारी द्रव्याची बाटली ताब्यात घेऊन पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
फिरण्याचा मोह पर्यटकांच्या अंगलट;जीव वाचवण्यासाठी मुलांची धोकादायक कसरत, वनविभागावर प्रश्नचिन्ह
यासंदर्भात पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी धुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर तहसिलदार, पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना २३ एप्रिल २०२३ रोजी आत्मदहनाचा इशारा देणारे निवेदन दिले होते. कोविड काळात १७ सप्टेंबर २०२० रोजी विद्यार्थ्यांच्या लसीची मागणी करण्यात आली. परंतू व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे एलसी देण्याऐवजी गुन्हेगारी स्वरूपाची वागणूक दिली. २९ जानेवारी २०२१ रोजी शाळेत दाखल्याची मागणी करण्यात आली असता, शाळेचे प्राचार्य आणि अध्यक्षांनी पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांना हाकलून लावले.

दोन्ही मुलांच्या एलसी १८ महिने रोखून धरल्या आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. यापैकी पुजा पवार ही विद्यार्थिनी नियमित शाळेत हजर राहून देखील आणि तिने बोर्डाच्या परीक्षेचा अर्ज भरलेला होता. तरीही तिला गैरहजर दाखवून तिचे शैक्षणिक नुकसान करून उज्वल भवितव्य धोक्यात आणले आहे. याचवेळी जयेश अजय पवार आणि ऋषी देविदास पवार या विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान झाले आहे, असा आरोप अजय पवार यांच्याकडून करण्यात आला आहे.

सोलापुरातील एका अपार्टमेंटमध्ये माकडाचा उच्छाद; घरात शिरून थेट फ्रीजमधील पदार्थांवर ताव

यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करून देखील शाळा व्यवस्थापनाने अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुठलाही सकारात्मक निर्णय घेतला नाही. उलट पूजा पवार या विद्यार्थिनीच्या हजेरीचे पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले आहेत. यामुळे होणाऱ्या सर्व परिणामांना शाळा व्यवस्थापन आणि प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा अजय शांताराम पवार यांनी दिला आला आहे. यावेळी धुळे जिल्हा विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी प्रविण मोरे यांनी अजय पवार यांच्या ताब्यातील पेट्रोलची कॅन, चाकू आणि विषारी द्रव्याची बाटली आपल्या ताब्यात घेऊन हस्तक्षेप केला. यामुळे पुढील अनर्थ टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed