अजित पवार यांनी संपूर्ण भाषणात २००४ पासूनचा घटना क्रम सांगितला. शरद पवारांनी त्यांच्या भूमिका कशा बदलल्या आणि आपल्याला तसेच इतर नेत्यांना उघड पाडले हे सांगितले. भाषणाच्या अखेरीस त्यांनी पवारांनी अशा काही लोकांना सोबत घेतले आहे ज्यांच्यामुळे संघटनेचे वाटोळे झाले आहे. अजित पवारांनी नाव घेतले नाही पण उदाहरण म्हणून त्यांनी तो ठाण्याचा पठ्ठ्या असा उल्लेख केला. त्याच्यामुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईल, निरंजन डावखरे हे आपला पक्ष सोडून केले. इतक नाही तर मागे वसंत डावखरे मला म्हणाले, साहेब का म्हणून याला मोठ करतात.
कार्यकर्ता कसा असला पाहिजे हे सांगताना अजित पवार म्हणाले, कार्यकर्त्याने जिथे आहे तेथे नेतृत्व केले पाहिजे. त्याच बरोबर बेजजेचे राजकारण केले पाहिजे. इथे उपस्थित मंत्र्यांनी किमान ४ आमदार निवडूण आणले पाहिजेत. मी या ९ जणांना सांगितले आहे की तुम्ही किमान ४ जण निवडूण आणा. बाकीची जबाबादीर माझी. इथे तर ज्याने आपले आमदार घालवले त्यालाच मंत्री केले, असे सांगत अजित पवारांनी पुन्हा एकदा नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केले. काही पक्षाचे प्रवक्ते बोलून चांगल्याचे वजवाटोळे करतात, असा टोला देखील अजित पवार यांनी संजय राऊत यांना अखेरीस लगावला.
अजित पवार यांच्या बरोबर मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी देखील पवारांच्या भूमिकेवर टीका केली. तर नेहमी शरद पवारांच्या सोबत असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी देखील आपल्यावर ही वेळ का आली असा सवाल उपस्थित केला आणि शरद पवारांनी आम्हा सर्वांना आशिर्वाद द्यावा अशी विनंती केली.