• Sat. Sep 21st, 2024
समृद्धीवरील अपघातांची मालिका थांबेना; सात महिन्यांत तीनशेहून जास्त अपघात, प्रमुख कारण काय?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शनिवारी खासगी प्रवासी बस अपघातानंतर पेटल्याने २५ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या सात महिन्यांमध्ये समृद्धी महामार्गावर ३४८ अपघात झाले आहेत. या महामार्गावर अपघात होण्याचे कारण हे ‘रोड हिप्नोसिस’मुळे होत असल्याची माहिती समोर येत आहे.

समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात शनिवारी खासगी बसला झालेल्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला, तर शिर्डी येथे रविवारी सकाळी झालेल्या अपघातात तीन जण मृत्युमुखी पडले आहेत. दोन दिवसांत समृद्धी महामार्गावर दोन अपघातांत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सात महिन्यांत एकूण ३४८ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गावर सुरुवातीला झालेल्या काही अपघातांनंतर तांत्रिक दोषामुळे अपघात होत असल्याची चर्चा सुरू झाली होती. या चर्चेनंतर वाहनांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुलढाणा अपघातातील दुर्दैवी प्रवासी अनंतात विलीन; नातेवाईकांकडून जड अंतःकरणाने निरोप

अपघाताची संख्या कमी करण्यासाठी आरटीओ विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. यासाठी नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन आरटीओ कार्यालयांची पथके तैनात करण्यात आला आहे. या पथकाने समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या वाहनांची तांत्रिक पद्धतीने तपासणी करण्यात आली. या वाहनांमध्ये तांत्रिक तपासणी झाल्यानंतर अनेक वाहनांना परत पाठविण्यात आलेले आहेत.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये वेगात चालविणाऱ्या वाहनधारकांना डुलकी येणे यांमुळे अपघात घडत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. सात महिन्यांत ३५८ अपघात घडलेली आहेत. यात १४३ गंभीर अपघात असून, २३६ किरकोळ अपघातात वाहनधारक जखमी झालेले आहेत, अशीही माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे.

Buldhana Bus Accident: स्लीपर बस नव्हे ही धावणारी शवपेटी… कसा गेला २६ जणांचा जीव? तज्ज्ञांनी मांडली धक्कादायक बाजू
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात ‘रोड हिप्नोसीस’ हे महत्वाचे कारण ठरत आहे. या रोड हिप्नोसिसबाबत काय करावे, यासाठी आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारासोबत चर्चा सुरू आहे. रोड हिप्नोसिस कमी करण्यासाठी आगामी काळात काही उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहितीही आरटीओ सूत्रांनी दिली.

महामार्गाचे १०१ किलोमीटरचे काम बाकी:

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. नागपूर ते शिर्डी दरम्यान ५२० किलोमीटरचे काम पूर्ण करण्यात आले. तर, शिर्डी ते इगतपुरीपर्यंत (नाशिक) पूर्ण करण्यात आले आहे. हे अंतर ८० किलोमीटर असून, त्याचे उद्घाटन २८ मे रोजी झाले. उर्वरित इगतपुरी ते मुंबई हा मार्ग १०१ किलोमीटरचा आहे. या मार्गाचे कामही सध्या सुरू असून, आगामी काही महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Bus Accident : अपघातानंतर मृतदेहांची अवस्था पाहावत नव्हती; गावातील महिलांनी नव्याकोऱ्या साड्या आणल्या आणि…

अपघाताची प्रमुख कारणे काय?
– वाहनाचे टायर फुटणे
– लेन कटिंगचा नियम न पाळणे
– रस्त्यावर जनावर येणे
– वाहनधारक अचानक रस्त्यात थांबणे

‘रोड हिप्नोसिस’ म्हणजे काय?
‘रोड हिप्नोसिस’ ही मानसिक अवस्था असून, सलग अडीच-तीन तास सलग वाहन चालवल्यानंतर चालकाच्या मनामध्ये ही अवस्था निर्माण होण्यास सुरुवात होते. एकसलगतेमुळे या अवस्थेमध्ये चालक वाहन चालवत असला, तरीही त्याचे मन अक्रियाशील होते. यामध्ये त्याला समोरील परिस्थितीचे चालक योग्य विश्लेषण करू शकत नाही आणि परिणामी गंभीर दुर्घटना होते.

विश्रांती आवश्यक
‘रोड हिप्नोसिस’ ही अवस्था टाळण्यासाठी चालकांनी दर अडीच-तीन तासांनी गाडी थांबवून विश्रांती घेतली पाहिजे. गाडी थांबवल्यानंतर चहा-कॉफी घेतानाच, मनालाही विश्रांती मिळते. वाहन चालवताना सतत आजूबाजूच्या वाहनांकडे पाहून आणि गेल्या काही मिनिटांमधील अवस्थेबद्दल विचार करावा. म्हणजे, ‘रोड हिप्नोसिस’ची अवस्था सुरू होण्यापूर्वीच थांबता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed