• Sat. Sep 21st, 2024

समृद्धी महामार्गावर कार दुभाजकावर धडकली, एअर बॅग्स उघडल्या पण… अख्खं कुटुंब क्षणात संपलं

समृद्धी महामार्गावर कार दुभाजकावर धडकली, एअर बॅग्स उघडल्या पण… अख्खं कुटुंब क्षणात संपलं

शिर्डी: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हा सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. शनिवारीच या महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये बस पेटल्याने तब्बल २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यानंतर आज पुन्हा समृद्धी महामार्गावर एक अपघात झालाय. त्यात तीन जणांचा बळी गेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात धोत्रे गावाजवळ भरधाव वेरना कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात आई-वडिलांसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ रविवारी २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. तिघेही मुंबई येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत असून नांदेड येथे बकरी ईद साजरी करण्यासाठी आले होते, अशी माहिती मिळत आहे. ते नांदेडहून हुंडाई वेरना कार क्रमांक एमएच ०४ जेव्ही २४३० मधून मुंबईकडे निघाले होते. कोपरगाव तालुक्यात धोत्रे शिवारात पोहचल्यानंतर चालकाचा हुंडाई वेरना कारवरचं नियंत्रण सुटल्याने ही गाडी पुलाच्या कठड्याला जावून धडकली. ही धडक एवढी जोराची होती की कारच्या एअरबॅग उघडूनही तिघांचा मृत्यू झालाय.

Buldhana Accident: मोठी बहीण म्हणाली- अग झोप उद्या खूप कामं आहेत; तनिषाने नेहमीसाठीच डोळे बंद केले
जावेद अख्तर सलीमुद्दिन (वय – ५८), शमीम बेगम (वय – ५१) आणी अक्रमुद्दीन (वय – २२) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. दिवसागणिक समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या वाढत चालली असून ठोस उपाययोजना करण्याची आणि नागरिकांनीही गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कालच बुलढाणा येथे खाजगी बसच्या अपघातात २५ जणांनी आपला जीव गमावला ती घटना ताजी असतानाच पुन्हा समृध्दी महामार्गावर अपघात घडल्याने वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बुलढाणा अपघातातील दुर्दैवी प्रवासी अनंतात विलीन; नातेवाईकांकडून जड अंतःकरणाने निरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed