• Wed. Jun 17th, 2026

    वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

    ByMH LIVE NEWS

    Jul 1, 2023
    वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

    मुंबई, दि. 1 :- माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळयास  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, निवृत्त जिल्हाधिकारी बी.के.नाईक, निवृत्त उप निबंधक  शिवचरण शिरे, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वसंतराव नाईक यांच्या पुतळयास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

    सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील वाढीव खाटांनुसार पदनिर्मितीचा सुधारित प्रस्ताव लवकरच; रुग्णसेवा अधिक सक्षम होणार – मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
    राज्यातील मृद व जलसंधारणाची सर्व कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड – महासंवाद
    विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धिंगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed